जिल्हधिकारी साहेब मेडिकल वाल्याची मनमानी थांबवा -सामाजिक कार्यकर्ते श्रीनिवास बोज्जा - Nagari Davandi : Breaking & Latest Marathi News Live, Marathi News Updates

Breaking

Post Top Ad

Sunday, May 16, 2021

जिल्हधिकारी साहेब मेडिकल वाल्याची मनमानी थांबवा -सामाजिक कार्यकर्ते श्रीनिवास बोज्जा

 जिल्हधिकारी साहेब मेडिकल वाल्याची मनमानी थांबवा -सामाजिक कार्यकर्ते श्रीनिवास बोज्जानगरी दवंडी

नगर - कोरोना प्रादुर्भावा मुळे नागरिक भयभीत झालेले असतांना काही मेडिकल वाले टालुवारची लोणी खाल्ल्या प्रमाणे मनमानी करीत आहे या करिता चौकशी स्कोड नेमून अचानक धाडी टाकून यांच्यावर कायदेशीर कारवाई करावी अशी मागणी सामाजिक कार्यकर्ते श्रीनिवास बोज्जा यांनी मा. जिल्हाधिकारी साहेब व मा. अन्न व औषधं प्रशासन आशिकारी यांना निवेदन द्वारे केले आहे

     सध्या अहमदनगर शहरा मध्ये काही मेडिकल मध्ये मनमानी कारभार चाललेला असून औषधावार 9/- रु किंमत असतांना 15/- रुपये किमतीने विक्री करणे असे का जाब विचारले पटले तर घ्या नाही तर दुसरीकडून घ्या, औषधं मिळतंय यात समाधान माना अश्या पद्धतीने उद्धट भाषा वापरत आहेत. तर काही मेडिकल वाले गोळया जर 6 लागत असतील तर पूर्ण स्ट्रीप घ्यावे लागेल कापून देता येणार नाही अशी भाषा करतायेत. स्ट्रीप जर 15 गोळीची असेल तर 15 गोळया घ्यावे लागतील असे सांगतायत व किंमत एका गोळीची 30/- रुपये असेल तर सामान्य जनतेने करायचे काय. सदर बाब अतिशय गंभीर असून या बाबत मा. जिल्हाधिकारी यांनी स्वतः लक्ष घालून अश्या मेडिकल वर कायदेशीर कारवाई करावी. या बाबत मेडिकल असोसिएशन च्या पदाधिकाऱ्यांशी चर्चा केली परंतु समाधानकारक उत्तर तेही देऊ शकले नाही.

 वास्तविकपाहता जितक्या गोळया लागतील तितक्याच देणे, छापील किंमतीपेक्षा जास्त किंमत नं घेणे तसेच मेडिसिन शिल्लक राहिल्यास परत घेणे अथवा त्या ऐवजी दुसरे मेडिसिन देणे असे कायदा असतांना ही मंडळी असे का वागतायत यांच्या मध्ये थोडी सुद्धा सामाजिक बांधिलकी नाही का असा प्रश्न पडतोय.

  या बाबत मेडिकल असोसिएशन ने ही पत्रक काढून मेडिकल व्यवसायिकानी अश्या चुका करू नये व सामाजिक बांधिकली पाळावी असे आवाहन सामाजिक कार्यकर्ते श्रीनिवास बोज्जा यांनी केले.

No comments:

Post a Comment