पारनेरच्या आमदारांना थेट हाय कमांडचा फोन.. - Nagari Davandi : Breaking & Latest Marathi News Live, Marathi News Updates

Breaking

Post Top Ad

Saturday, May 1, 2021

पारनेरच्या आमदारांना थेट हाय कमांडचा फोन..

 पारनेरच्या आमदारांना थेट हाय कमांडचा फोन..

इतरांची काळजी घेताना स्वतःची काळजी घे

शरद पवारांचा आ.लंके यांना वडिलकीचा सल्ला

कोविड सेंटर उभारून रुग्ण सेवेबद्दल केले कौतुक



नगरी दवंडी

पारनेर प्रतिनिधी:- रुग्णालयातून डिस्चार्ज घेतल्यानंतर राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाचे राष्ट्रीय अध्यक्ष शरद पवार यांनी आपल्या आमदार व खासदारांनी आपले एक महिन्याचे मानधन कोरोना विरोधातील लढाई साठी द्यावे त्याचबरोबर राष्ट्रवादी वेल्फेअर मधून एक कोटी रुपयांचा निधी मुख्यमंत्री सहाय्यता निधीत द्यावा असा अशा प्रकारच्या सूचना केल्या. त्यानंतर लागलीच पारनेर नगरचे आमदार निलेश लंके यांना फोन करून त्यांनी कोविड सेंटर सुरू करून त्याठिकाणी रुग्णसेवा करीत असल्याबद्दल त्यांचे कौतुक केले. पक्षाच्या हाय कमांडने फोन केल्यानंतर  आ.लंके यांना अधिक प्रोत्साहन आणि प्रेरणा मिळाली.

कोरोनाचे वैश्विक संकट अधिक गडद होताना दिसत आहे. दुसऱ्याला लाटेत  मोठ्या प्रमाणात रुग्ण सापडत असल्याने चिंता वाढली आहे. काहींचा यामुळे मृत्यू सुद्धा झाला आहे. दरम्यान महाराष्ट्रामध्ये कोरोना विषाणू ची साखळी तोडण्याच्या अनुषंगाने महाविकासआघाडी शर्तीचे प्रयत्न करीत आहे. शासनाने या  उद्देशाने कडक निर्बंध लावले आहेत. ते पुढे 15 मे पर्यंत असेच सुरू राहणार आहेत. राज्यात ऑक्‍सिजन आणि रेमडीसिव्हरचा मोठा तुटवडा जाणवत आहे. या सर्व पार्श्वभूमीवर राज्य सरकारकडून  प्रयत्न सुरू आहेत. हे सर्व संकट सुरू असताना मध्यंतरी राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाचे राष्ट्रीय अध्यक्ष शरद पवार यांना पित्ताच्या खड्याचा त्रास झाल्यामुळे त्यांना ब्रीच कँडी हॉस्पिटलमध्ये उपचारासाठी दाखल करण्यात आले होते. त्यांच्यावर नुकतीच दुसरी यशस्वी शस्त्रक्रिया करण्यात आली. त्यानंतर काही दिवस पवार रुग्णालयातच होते. उपचार घेत असताना ते  सातत्याने महाराष्ट्रातील कोरोना स्थितीचा आढावा घेत होते. याबाबत उपमुख्यमंत्र्यांसह आरोग्य मंत्री आणि इतरांकडून माहिती घेत होते. दरम्यान शुक्रवारी त्यांना रुग्णालयातून डिस्चार्ज देण्यात आला. गेल्या काही दिवसांपासून पारनेर नगरचे आमदार निलेश लंके यांचे कोरोना  काळातील कामाचे खऱ्या अर्थाने राज्यभर कौतुक होत आहे. अडचणीच्या काळात जनतेसाठी त्यांनी तालुक्यातील भाळवणी येथे 1100 बेडचे शरदचंद्रजी पवार आरोग्यमंत्री या नावाने गेल्या वर्षाप्रमाणे यंदाही कोविड सेंटर सुरू केले आहे. याठिकाणी रुग्णांना मोफत उपचार,जेवन आणि इतर सुविधा पुरवल्या जात आहेत. याची दखल माध्यमांनी सुद्धा घेतली आहे. दरम्यान आमदार निलेश लंके हे करीत असलेल्या कामाचे कौतुक करण्यात पक्षाचे राष्ट्रीय अध्यक्ष शरद पवार यांना सुद्धा राहवले नाही. त्यांनी रुग्णालयातून डिस्चार्ज घेतल्यानंतर लागलीच आ.लंके यांना फोन करून ते करत असलेल्या कामाबद्दल कौतुक केले. त्याचबरोबर त्यांनी रूग्णा बरोबरच स्वतःची काळजी घेण्याचा सल्ला दिला. शुक्रवारी खासदार सुप्रिया सुळे यांनी फेसबुक वर पोस्ट शेअर करत आमदार निलेश लंके यांचे कोरोना काळातील कामाचे कौतुक केले.

फोनवर काय बोलले शरद पवार!

निलेश तू कोरोना रुग्णांना मोफत उपचार करण्यासाठी कोविड सेंटर सुरू केले ही बाब अत्यंत कौतुकास्पद आहे. या कामी स्वतः लक्ष घालून रुग्णांची विचारपूस करतो त्याचबरोबर त्यांना चांगल्या पद्धतीने वैद्यकीय सुविधा उपलब्ध करून दिल्या जातात. त्यांच्यात जेवण्याची राहण्याची उत्तम सोयी त्याठिकाणी  करण्यात आली आहे. हे काम अतिशय चांगले  आहे. रुग्णांची काळजी घेत असताना तू स्वतःचीही  काळजी घे! काही लागल्यास मला कळव

No comments:

Post a Comment