पत्रकारांना अहमदनगर शहर जिल्हा काँग्रेस व किरण काळे युथ फाउंडेशनच्या सौजन्याने सेफ्टी किट अहमदनगर प्रेस क्लबकडे सुपूर्द - Nagari Davandi : Breaking & Latest Marathi News Live, Marathi News Updates

Breaking

Post Top Ad

Responsive Ads Here

Tuesday, May 4, 2021

पत्रकारांना अहमदनगर शहर जिल्हा काँग्रेस व किरण काळे युथ फाउंडेशनच्या सौजन्याने सेफ्टी किट अहमदनगर प्रेस क्लबकडे सुपूर्द

 पत्रकारांना अहमदनगर शहर जिल्हा काँग्रेस व  किरण काळे युथ फाउंडेशनच्या सौजन्याने सेफ्टी किट अहमदनगर प्रेस क्लबकडे सुपूर्दनगरी दवंडी

प्रतिनिधी : डॉक्टर्स, वैद्यकीय कर्मचारी, प्रशासन, पोलिस यांच्याप्रमाणेच कोरोना महामारीच्या कालावधीमध्ये पत्रकार हे देखील रस्त्यावरती उतरून फ्रंटलाईन वर्कर म्हणून पूर्ण वेळ काम करीत आहेत. पत्रकार हे कोरोना योद्धा आहेत. त्यांची सुरक्षा महत्त्वाची असून त्यासाठी त्यांना सुरक्षेची आयुधे मिळण्याची गरज आहे. याच भावनेतून अहमदनगर शहर जिल्हा काँग्रेस कमिटीच्या वतीने अहमदनगर प्रेस क्लबकडे नगर शहरातील सर्व पत्रकारांसाठी कोरोना सेफ्टी किटचे वाटप करण्यात आले असल्याचे प्रतिपादन काँग्रेसचे शहर जिल्हाध्यक्ष किरण काळे यांनी केले आहे. 

यावेळी अहमदनगर प्रेस क्लबचे अध्यक्ष शिवाजीराव शिर्के, ब्लॉक काँग्रेस कमिटीचे अध्यक्ष मनोज गुंदेचा, शहर जिल्हा उपाध्यक्ष अनंतराव गारदे, विद्यार्थी काँग्रेसचे प्रभारी अनिस चुडीवाला, क्रीडा काँग्रेसचे शहर जिल्हाध्यक्ष प्रवीण गीते आदी उपस्थित होते. 

यावेळी बोलताना किरण काळे म्हणाले की, नगर शहरामध्ये  सकाळी प्रकाशित होणारी दैनिके, सायं दैनिके, ऑनलाईन न्यूज पोर्टल, विविध इलेक्ट्रॉनिक मीडिया यांचे प्रतिनिधी पत्रकार हे शहरात कोरोनाचा वाढता प्रादुर्भाव असला तरी देखील जीव धोक्यात घालून वार्तांकन करत असतात. कोरोनाच्या बाबतीमध्ये समाजामध्ये मोठ्या प्रमाणात सकारात्मक पद्धतीने जनजागृती करण्याचे काम पत्रकारांनी केले आहे. सर्वच संपादक, त्यांची कार्यालयीन टीम तसेच प्रत्यक्ष मैदानामध्ये उतरून वार्तांकन करणारे वार्ताहार यांच्या योगदानाला काँग्रेसच्या वतीने आम्ही सलाम करतो, असे यावेळी काळे म्हणाले. 

किरण काळे युथ फाउंडेशनच्या सौजन्याने हे किट उपलब्ध करून देण्यात आले आहेत. नगर शहरातील सर्व पत्रकारांना किटचे वितरण अहमदनगर प्रेस क्लबच्या माध्यमातून केले जाईल, अशी ग्वाही यावेळी बोलताना अध्यक्ष शिवाजीराव शिर्के यांनी दिली. 

काळे म्हणाले की, महसूल मंत्री ना.बाळासाहेब थोरात यांनी पत्रकारांच्या सुरक्षिततेसाठी राज्य पातळीवर स्वतः पुढाकार घेतला असून पत्रकारांचा फ्रंटलाईनमध्ये समावेश करण्यात यावा, तसेच सर्व पत्रकारांचे प्राधान्याने व तातडीने लसीकरण करून घेण्यात यावे अशा प्रकारची भूमिका सरकारमध्ये मांडली आहे. ना. थोरात यांच्या या भूमिकेतून प्रेरणा घेत नगर शहर जिल्हा काँग्रेस कमिटीने पत्रकारांच्या सुरक्षिततेसाठी हा उपक्रम नगर शहरामध्ये राबविला आहे. 

किरण काळे युथ फाऊंडेशनचे प्रवीण गीते म्हणाले की,  नगर शहरातील युवकांसाठी युथ आयकॉन असणाऱ्या किरणभाऊ काळे यांच्या मार्गदर्शनाखाली फाउंडेशनच्या माध्यमातून पत्रकारांसाठी तसेच नगर शहरातील नागरिकांसाठी कोरोना संदर्भामध्ये विविध उपक्रम हाती घेण्यात आले असून यापुढील काळात देखील मोठ्या प्रमाणात फाऊंडेशन मदत कार्य करत राहणार आहे.

No comments:

Post a Comment

Post Bottom Ad

Responsive Ads Here