ओबीसी समाज बांधवांच्या भावना दुखावल्या बद्दल भाजप प्रदेशाध्यक्ष चंद्रकांत पाटील यांच्यावर गुन्हा दाखल करावा - दत्ता जाधव - Nagari Davandi : Breaking & Latest Marathi News Live, Marathi News Updates

Breaking

Post Top Ad

Tuesday, May 4, 2021

ओबीसी समाज बांधवांच्या भावना दुखावल्या बद्दल भाजप प्रदेशाध्यक्ष चंद्रकांत पाटील यांच्यावर गुन्हा दाखल करावा - दत्ता जाधव

 ओबीसी समाज बांधवांच्या भावना दुखावल्या बद्दल भाजप प्रदेशाध्यक्ष चंद्रकांत पाटील यांच्यावर गुन्हा दाखल करावा - दत्ता जाधवनगरी दवंडी

अहमदनगर -राज्याचे अन्न व नागरी पुरवठा मंत्री ना. छगनराव भुजबळ साहेब यांनी पश्चिम बंगाल मधील तृमणल कॉंग्रेसच्या नेत्या ममता बॅनर्जी यांनी जे घवघवीत यश संपादन केले. त्याबद्दल त्यांना झाशीची राणी म्हणून संबोधले याबाबत भाजप प्रदेशाध्यक्ष चंद्रकांत पाटील यांनी ना. छगनराव भुजबळसाहेब यांच्याबद्दल धमकीची भाषा वापरून चंद्रकांत पाटील यांना एका महिलेने घवघवीत यश मिळवल्याचा राग आहे कि महिलान बद्दल एवढा आकस  आहे का चंद्रकांत पाटील यांनी ज्या पद्धतीने धमकी दिले आहे त्याअर्थी न्यायव्यवस्थाही कोणाच्या सांगण्यावरून चालते का किंवा कोणत्या पक्षाच्या हाताच खेळ झाला आहे असा संशय निर्माण होतो. त्याचा अखिल भारतीय महात्मा फुले समता परिषदेच्या वतीने तीव्र शब्दात निषेध जाहीर करत आहोत.ना.भुजबळ हे ओबीसींचे नेते आहेत.त्यांचे राज्यात सुरू असलेले काम हे विरोधकांना पाहावत नाही. त्यामुळेच चंद्रकांत पाटील यांनी केलेल्या वक्तव्याची त्यांनी जाहीर माफी मागावी. समस्त ओबीसी समाज बांधवांच्या भावना दुखावल्या आहेत. अन्यथा त्यांना नगर जिल्ह्यात पाय ठेऊ देणार नाही. असा इशारा अखिल भारतीय महात्मा फुले समता परिषदेचे महानगराध्यक्ष.दत्ता जाधव यांनी दिली आहे.तसेच लवकरच राज्यातील व जिल्ह्यातील सर्व पोलीस स्टेशन मध्ये गुन्हे दाखल करणार असल्याचे जाधव यांनी सांगितले..

No comments:

Post a Comment