या गावात माझे कुटुंब, माझी जबाबदारी’ सर्वेक्षणास सुरुवात - Nagari Davandi : Breaking & Latest Marathi News Live, Marathi News Updates

Breaking

Post Top Ad

Sunday, May 2, 2021

या गावात माझे कुटुंब, माझी जबाबदारी’ सर्वेक्षणास सुरुवात

 या गावात माझे कुटुंब, माझी जबाबदारी’ सर्वेक्षणास सुरुवातनगरी दवंडी

गुंडेगाव  :- नगर तालुक्यातील गुंडेगाव येथे  पुन्हा ‘माझे कुटुंब, माझी जबाबदारी’ या अंतर्गत सर्वेक्षण करण्यास सुरुवात झाली आहे . त्यासाठी गावस्तरावर पथके स्थापन करण्यात आली असून घरांचा सर्व्हे या पथकाला करावा लागणार आहे.

गावातील  गेल्यावर्षी कोरोनाकाळात ‘माझे कुटुंब, माझी जबादारी’ या अंतर्गत दोन टप्प्यांत सर्वेक्षण करण्यात आले होते. त्यात अनेक व्याधींचे रुग्ण निष्पन्न झाले होते शिवाय कोरोनाचे लक्षणे असलेल्या संशयित रुग्णांची पडताळणी होऊन त्यांना लागलीच उपचार मिळण्यास देखील मदत झाली होती. आता तशाच प्रकारचा सर्व्हे  करण्याचे निर्देश देण्यात आले .

     गुंडेगाव येथे  पथकांची स्थापना करून कामाला सुरूवात झाली आहे. पथकात गावातील शाळेतील शिक्षक, आशासेविका, अंगणवाडीसेविका यांचा समावेश आहे.

सर्व्हेक्षण अंतर्गत प्रत्येक कुटुंबातील प्रत्येक व्यक्तींची ताप, खोकला, दम लागणे, पल्स रेट, शरीरारील ऑक्सिजनची लेव्हल, एएलआय आणि सारी या आजारांची तपासणी केली जात आसून . याशिवाय कोरोनाच्या इतर लक्षणांचीही माहिती याद्वारे घेतली जाणार आहे.गावातील  अनेक रुग्णांना कोरोनाची लक्षणे असतांनाही त्याकडे दुर्लक्ष करून उपचार घेण्यास उशीर करत असतात. आजार बळावल्यावर दवाखान्यात दाखल होतात. अशावेळी रुग्णाची प्रकृती खालावते. त्यामुळे या मोहिमेअंतर्गत जास्तीत जास्त संशयित रुग्णांपर्यंत पोहोचणे व त्यांना संदर्भीय उपचार देणे हा उद्देश असल्याचे प्रशासनातर्फे स्पष्ट करण्यात आले आहे.

           माझे कुटुंब माझी जबाबदारी मोहीम यशस्वीपणे करण्यासाठी पर्यवेक्षक एस.बी.भागवत,ग्रामसेवक गोवर्धन राठोड,  उपसंरपच संतोष भापकर ,डॉ.विलास दाताळ, सतिश चौधरी, संतोष सकट, राहुल चौधरी,संजय भापकर  व आशा सेविका श्रीमती. कविता कुताळ, प्रिती भापकर, मनिषा कुताळ व सर्व शिक्षक,  अंगणवाडी सेविका यांनी  सहकार्य  करत आहेत.

No comments:

Post a Comment