नगर शहरात उद्या रात्री 12वाजल्यापासून 10 मे पर्यंत कडक लॉकडाऊन - Nagari Davandi : Breaking & Latest Marathi News Live, Marathi News Updates

Breaking

Post Top Ad

Saturday, May 1, 2021

नगर शहरात उद्या रात्री 12वाजल्यापासून 10 मे पर्यंत कडक लॉकडाऊन

 नगर शहरात उद्या रात्री 12वाजल्यापासून 10 मे पर्यंत कडक लॉकडाऊन

आ. संग्राम जगताप व  आयुक्त शंकर गोरे यांनी शहरातील विविध भागात केली पाहणी



नगरी दवंडी

अहमदनगर- नगर शहरामध्ये कोरोना चा प्रादुर्भाव विषाणूंचा प्रादुर्भाव मोठ्या प्रमाणात वाढत असल्यामुळे दिवसेंदिवस रुग्ण संख्येत वाढ होताना दिसत आहे त्यामुळे नागरिकांच्या आरोग्याचा प्रश्न निर्माण झाला आहे कोरोना चा संसर्ग तोडण्यासाठी अहमदनगर महानगरपालिकेच्या वतीने सात दिवसाचा कडक लॉक डाऊन जाहीर केला आहे उद्या रात्री बारा वाजल्यापासून ते 10 मे पर्यंत कडक लॉकडाऊन जाहीर केला आहे यामध्ये आरोग्य सुविधा सोडून  फक्त दूध सकळी 7 ते 11 पर्यत  विक्री चालू   तसेच किराणा विक्री व भाजीपाला विक्री बंद राहणार आहे तरी कृपा करून शेतकऱ्यांनी नगर शहरामध्ये आपला शेतीमाल विक्रीत आणू नये अन्यथा मनपाच्या वतीने कायदेशीर कारवाई केली जाईल असा इशारा आयुक्त शंकर गोरे यांनी आज प्रसारमाध्यमांशी बोलताना दिला

    कडक लॉकडाऊनच्या पार्श्वभूमीवर शहराचे आमदार संग्राम जगताप महापालिका आयुक्त शंकर गोरे, उपायुक्त यशवंत डांगे, पोलीस उपविभागीय अधिकारी विशाल ढुमे  तसेच  कोतवाली व तोफखाना पोलीस ठाण्याचे निरीक्षक यांनी मार्केट यार्ड महात्मा फुले चौक येथे पाहणी केली 

     पोलीस उपविभागीय अधिकारी विशाल ढुमे यांनी यावेळी सांगितले की नागरिकांनी विनाकारण रस्त्यावर फिरू नये कोणीही जॉगिंग साठी बाहेर पडू नये विनाकारण करणार्‍यांवर कायदेशीर कारवाई केली जाईल असे त्यानी सांगितले

No comments:

Post a Comment