नगर शहरासाठी लसीकरणाचे दहा हजार डोस प्राप्त - Nagari Davandi : Breaking & Latest Marathi News Live, Marathi News Updates

Breaking

Post Top Ad

Sunday, May 2, 2021

नगर शहरासाठी लसीकरणाचे दहा हजार डोस प्राप्त

 सरकारकडे लसीकरणाचे डोस मिळण्यासाठी प्रयत्नशील- आ. संग्राम जगताप

नगर शहरासाठी लसीकरणाचे दहा हजार डोस प्राप्त



नगरी दवंडी

अहमदनगर प्रतिनिधी- कोरोना विषाणूचा प्रादुर्भाव शहरासह जिल्ह्यात मोठ्या प्रमाणात वाढत आहे असल्या मुळे नागरिकांमध्ये भीतीचे वातावरण पसरले आहे कोरोनाचा प्रादुर्भाव थांबविण्यासाठी प्रत्येकाने नियमाचे पालन करणे गरजेचे आहे. याच बरोबर  कोरोना प्रतिबंधक लसीकरण करणे गरजेचे आहे यासाठी शासनाच्या वतीने आज 1 मे पासून 18 वर्ष ते 44 वर्षी पर्यतच्या नागरिकांना कोरणा प्रतिबंधक लसीकरण सुरू करण्यात आले आहे. अहमदनगर महानगरपालिकेला 10 हजार लसीकरणासाठी डोस पुरवठा झाला असून लवकरात लवकर जास्तीत जास्त लसीकरनाचे डोस प्राप्त करण्यासाठी शासन दरबारी पाठपुरावा करून लस उपलब्ध करण्यासाठी प्रयत्नशील आहे असे प्रतिपादन आ. संग्राम जगताप यांनी केले

अहमदनगर महानगरपालिकेच्या वतीने 18 वर्ष ते 44 वर्षा पर्यंतच्या वयोगटातील नागरिकांना जिजामाता आरोग्य केंद्रात लसीकरणाचा शुभारंभ आ. संग्राम जगताप व आयुक्त शंकर गोरे यांच्या उपस्थितीत संपन्न झाला यावेळी उपायुक्त यशवंत डांगे, तसेच डॉक्टर, नर्स आरोग्य कर्मचारी उपस्थित होते

आयुक्त शंकर गोरे म्हणाले की, महाराष्ट्र दिनी 18 वर्ष ते 44 वर्षे वयोगटातील नागरिकांना लसीकरणाचा कार्यक्रम नगर शहरामध्ये सुरू झाला असून अहमदनगर महानगर पालिकेला शासनाकडून 10 हजार लसीकरणाचे डोस उपलब्ध झाले आहे. शहरांमध्ये पाच लसीकरण केंद्रावर दररोज दीड हजार लसीकरणाचे डोस दिले जाणार आहेत. यासाठी नागरिकांनी आरोग्य सेतू ॲप वर नोंदणी करणे बंधनकारक असून तरी सर्व नागरिकांनी नाव नोंदणी करावी असे आवाहन त्यांनी केले. आज शहराचे आमदार संग्राम जगताप यांच्या उपस्थितीत 18 वर्षे पूर्ण असलेल्या बालिकेला लसीकरणाचा डोस देऊन शुभारंभ संपन्न झाला

No comments:

Post a Comment