घोडनदी पात्रातून हजारो ब्रास अवैध माती उपसा... श्रीगोंदा महसुल प्रशासनाचे हेतूपूर्वक दुर्लक्ष? - Nagari Davandi : Breaking & Latest Marathi News Live, Marathi News Updates

Breaking

Post Top Ad

Monday, May 31, 2021

घोडनदी पात्रातून हजारो ब्रास अवैध माती उपसा... श्रीगोंदा महसुल प्रशासनाचे हेतूपूर्वक दुर्लक्ष?

 घोडनदी पात्रातून हजारो ब्रास अवैध माती उपसा...

श्रीगोंदा महसुल प्रशासनाचे हेतूपूर्वक दुर्लक्ष? नगरी दवंडी

श्रीगोंदा प्रतिनिधी : 

श्रीगोंदा तालुक्यातील मौजे माठ गावच्या हद्दीतून वाहणाऱ्या घोड नदीच्या पात्रातून बेसुमार पोयटा वाहतूक विनापरवाना राजरोस सुरु असून महसूल विभागाने या कडे दुर्लक्ष केल्याचे दिसून येते. कुठलीही परवानगी नसताना घोड नदी पात्रातून तीस ते चाळीस जेसीबी , पोकलॅन्ड च्या साहायाने दोनशे ते तीनशे ट्रॅकटर , ट्रक , हायवा च्या साहाय्याने वीट भट्टी साठी गौणखनिज पोयटा ची बेसुमार उपसा सुरु असताना माठ गावच्या हद्दीत महसूल यंत्रणेने आत्तापर्यंत कुठलीच कारवाई केली नसल्याने राजकीय सांगड आणि झोपलेले महसूल प्रशासन यामुळे  गावातले सर्वसामान्य नागरिक मात्र या वाहनाच्या वर्दळीमुळे आणि या वाहनाच्या मधून उडणाऱ्या धूळ आणि माती मुळे त्रस्त झाले आहेत . श्रीगोंदा तालुक्यात शिरूर च्या दिशेने घोडनदी प्रवेश करते या घोड नदीच्या पात्रावर चिंचणी धरण आहे या धरणाच्या बुडीत क्षेत्रात येणारे माठ गावच्या हद्दीत घोड नदीच्या पात्रात मोठ्या प्रमाणत वाळु आणि वीट भट्टी साठी लागणार पोयटा माती आहे . सध्या नदीच्या पात्रातील पाणी आटले असल्याने या भागात असणाऱ्या शेकडो वीट भट्टी चालकांनी या नदीच्या पात्रातून विनापरवाना महसूल बुडवून मातीचा उपसा सुरु केला आहे . नदीच्या पात्रात जेसीबी , पोकलॅन्ड च्या साह्याने ट्रॅक्टर , ट्रक , हायवा गाडीमधून लाखो ब्रास मातीचा उपसा राजरोस सुरु आहे . महसूल यंत्रणा याबाबत कुठलीही ठोस कारवाई करत नसल्याने गावातील अनेक नागरिक या सर्व प्रकारामुळे त्रस्त झाली आहे . नदीच्या पात्रातून बाहेर येणारा रस्ता गावातून जातो यामुळे गावची झोप उडाली आहे . दिवसरात्र या मातीचा उपसा होत असल्याने या बाबत तक्रारी करूनही कारवाई होत नसल्याचे ग्रामस्थांनी सांगितले आहे . 

घोडनदी पात्रातून उपसा होणाऱ्या अवैध माती उपश्याच्या परवान्याबाबत देवदैठन मंडळअधिकारी भाऊसाहेब साबळे यांना विचारले असता त्यांनी सांगितले की माठ, राजापूर येथील १० ते १२ जणांनी माती उपसा  परवाना घेतला असून उर्वरित जणांशी माझे बोलणे झाले असून ते उद्या (सोमवार दि.३१ रोजी माती उपसा परवाने घेणार असल्याची माहिती दिली.

No comments:

Post a Comment