वादळी वाऱ्याने घराची भिंत पडून लहान मुलाचा मृत्यू - Nagari Davandi : Breaking & Latest Marathi News Live, Marathi News Updates

Breaking

Post Top Ad

Monday, May 31, 2021

वादळी वाऱ्याने घराची भिंत पडून लहान मुलाचा मृत्यू

 वादळी वाऱ्याने घराची भिंत पडून लहान मुलाचा मृत्यू

श्रीगोंदा तालुक्यातील कोरेगाव येथील हृदयदायक घटना



नगरी दवंडी

श्रीगोंदा प्रतिनिधी : 

श्रीगोंदा तालुक्यातील कोरेगाव येथे रविवार दि.30 रोजी झालेल्या वादळी वारे आणि पावसात घराची भिंत कोसळून सहा वर्ष वयाच्या आरव भाऊसाहेब इंगावले या मुलाचा जागीच मृत्यू झाला. तर तीन मजूर किरकोळ जखमी झाले.

           तालुक्यातील कोरेगाव येथील साकळाई वस्तीवर गोरख ताण्याबा इंगावले यांच्या घराचे सिंगल विटांचे बांधकाम चालू होते. रविवारी दुपारी परिसरात वादळी वारा सुटल्याने बांधकाम मजुरांसह ६ वर्षीय आरव याने घराच्या बांधकामाचा आडोसा घेतला असता वाऱ्याच्या वेगाने दहा फूट उंचीच्या चारही बाजूंच्या भिंती कोसळल्या यात आरव भाऊसाहेब इंगावले वय ६ याचा विटांच्या ढिगाऱ्या खाली येऊन जागीच मृत्यू झाला तर तीन मजूर किरकोळ जखमी झाले .

No comments:

Post a Comment