लाखो लसींचे डोस गेले कुठे? - Nagari Davandi : Breaking & Latest Marathi News Live, Marathi News Updates

Breaking

Post Top Ad

Tuesday, May 25, 2021

लाखो लसींचे डोस गेले कुठे?

 लाखो लसींचे डोस गेले कुठे?

मनसे नगर जिल्हा सचिवांचा आरोग्य मंत्री टोपेंना सवाल...

झालेल्या लसीकरणाचे ऑडिट होणे खुप गरजेचे आहे. तसेच अहमदनगर शहरात राजकिय पुढार्‍यांच्या मार्फत खाजगी हॉटेल, राजकिय लोकप्रतिनिधी यांच्या घरात जाऊन लसीकरण केले जात असल्याची चर्चा मोठ्या प्रमाणावर सूरू आहे.त्यातच 18 वर्षाखालील मुलांना सुध्दा अश्या खाजगी जागेमध्ये लसीकरण होत असल्याची चर्चा शहरात सूरू आहे.शहरातील  राजकिय पुढार्‍यांना खाजगीत घरी जाऊन लसीकरण केले जाते लसीचे डोस वितरित केले जाते अशी चर्चा शहरात जोर धरत आहे.अहमदनगर शहरात आठ लसीकरण केंद्र व जवळ्पास 20 उपकेंद्र सूरू आसून हे सर्व लसीकरण केंद्र स्थानीक नगरसेवकांच्या ताब्यात असल्यामुळें त्यांचे हितचिंतक व नातेवाईकांना सोडुन सर्व सामान्य नागरिकांना लस मिळतं नसल्याचे दिसून येत आहे. त्यातूनच लस च्या बॉटल पलविण्याचे प्रकार सुध्दा अहमदनगर शहरात घडत असल्याचे समजत आहे. अश्या सर्व प्रकारामुळे लसी खराब सुध्दा झाल्या असतील व खराब डोस चे लसीकरण जर नागरिकांना होत असेल तर त्या झालेला लासिकरनाचा काय उपयोग होणार?



नगरी दवंडी/प्रिंतनिधी
अहमदनगर ः नगर शहरातील कोरोना लसीकरणातील सावळा गोंधळ संपण्यास तयार नाही. मनपा प्रशासन म्हणते... लसीकरण करणार असलेल्यांची नावे रुग्णालयाच्या बाहेर लावू. नावे असणारे रुग्ण मनपाचा रुग्णालयात लसीकरणासाठी आले, तर लसी शिल्लक नसल्याचे सांगितले जाते. मनपा आरोग्य विभाग व जिल्हा रुग्णालयातून 1लाख 26 हजार डोसचे लसीकरण केले असल्याचे सांगितले जात आहे. आजही ज्येष्ठ नागरिक लसीकरणापासून वंचित आहेत. मग या लसी गेल्या कुठे? असा सवाल मनसेचे जिल्हा सचिव नितीन भुसारे यांनी आरोग्य मंत्री राजेश टोपे यांना एका निवेदनाद्वारे केला आहे.
महाराष्ट्र नवनिर्माण सेनेचे नितीन भुतारे यांनी जिल्हा परिषद आरोग्य विभागातील अधिकारी यांच्या मार्फत अहमदनगर शहरातील लसीकरण डोस बाबत माहिती घेतली असता आज पर्यंत अहमदनगर महानगरपालिका व सिव्हिल  हॉस्पिटल मिळून शहरातला 1 लाख 26 हजार डोस चे वितरण केले असून अजूनही ज्येष्ठ नागरिकांचे लसीकरण झाल्याचे दिसत नाही आजही अनेक ज्येष्ठ नागरिक पहिल्या डोस पासून वंचित आहेत. त्यामुळे 4 लाख लोक संख्येच्या शहरात ईतक्या मोठ्या प्रमाणात लसीकरण होऊन देखिल ऋषीकेश रघुनाथ आल्हाट, मारीया बन्सी आल्हाट (सर्व रा. पिंपळगाव उज्जैनी ता. नगर) असे गुन्हा दाखल झालेल्या आरोपींचे नावे आहेत. यापैकी सुभाष, बन्सी, मारिया या आरोपींना अटक करण्यात आली आहे. आरोपी मल्हारी आल्हाट यांच्यावर रुग्णालयात उपचार सुरू आहे. बाळासाहेब नामदेव वाघ (वय 50 रा. पिंपळगाव उज्जैनी) यांनी फिर्याद दिली आहे. घटनेची माहिती मिळताच नगर ग्रामीणचे पोलीस उपअधीक्षक अजित पाटील, सहायक निरीक्षक युवराज आठरे यांनी घटनास्थळी धाव घेतली. पुढील तपास एमआयडीसी पोलीस करत आहे.

No comments:

Post a Comment