एक झाड लावा आपल्या प्रियजनांसाठी’ युवा उद्योजक गौतम मुनोत यांचे भावनिक आवाहन - Nagari Davandi : Breaking & Latest Marathi News Live, Marathi News Updates

Breaking

Post Top Ad

Tuesday, May 25, 2021

एक झाड लावा आपल्या प्रियजनांसाठी’ युवा उद्योजक गौतम मुनोत यांचे भावनिक आवाहन

 एक झाड लावा आपल्या प्रियजनांसाठी’ युवा उद्योजक गौतम मुनोत यांचे भावनिक आवाहन

नगरी दवंडी/प्रतिनिधी
अहमदनगर ः कोरोनाच्या दुसर्‍या लाटेत  अनेकांची होरपळ होत आहे. अनेक जणांनी आपले आप्तेष्ट गमावले आहेत. कुणाला ऑक्सिजन बेड मिळाले नाही, तर कोणाला इंजेक्शन. आपल्या जवळची माणसं गमवण्याचा दुःख नक्कीच मोठं आहे. अनेक ठिकाणी तर कुटुंबच उध्वस्त झाले आहेत. रोजच्या येणार या बातम्यांमुळे खिन्न मनस्थिती निर्माण होत चालली आहे. बर्‍याच संस्था आणि माणसं हे संकट दूर करण्यासाठी अटीतटीचे प्रयत्न करीत आहेत, परंतु दुःखाचे सावट कमी होत नाही.
हीच उद्विग्नता दूर करण्यासाठी मदत व्हावी, आपल्या जवळच्या गेलेल्या माणसाची आठवण कायम ठेवण्यासाठी अहमदनगरचे प्रसिद्ध उद्योजक गौतम मुनोत यांनी सोशल मीडियाद्वारे एक झाड लावा आपल्या प्रियजनांसाठी असे आवाहन केले. ही पोस्ट बरीच वायरल झाली असून आणि लोकांच्या त्यावर चांगल्या प्रतिक्रिया देखील येत आहेत.त्यांनी आपल्या पोस्टमध्ये लिहिले होते,सध्या मोबाईलला हात लावणं पण भयावह होत चाललं आहे. रोज फेसबुक वर कोणाचे ना कोणाचे फोटो येतात आणि जड अंतःकरणानं भावपूर्ण श्रद्धांजली त्यावर लिहावं लागत आहे. शाळा-कॉलेजमधून बाहेर पडल्यानंतर क्वचितच काही मित्र आपल्या खूप संपर्कात असतात. पण इतर जणांचे व्हॉट्सप आणि फेसबुक मुळे अपडेट्स कायम मिळत राहतात.अचानकपणे त्यांचेच ठखझ म्हणून फोटो समोर येतात  तेव्हा जाणीव होते निर्माण झालेल्या पोकळीची. खूप हळहळ वाटते,अरे असा अचानक... नि:शब्द व्हायला होतं.वेळ आली होती, नशिबाच्या पुढे काय, जाणार्याला कोण थांबवू शकतो अशा एक ना अनेक गोष्टींनी आपण स्वतःला समजावण्याचा प्रयत्न करून सावरू लागतो. तोच पुन्हा एखादी दुसरी बातमी येते आणि ही पोकळी वाढू लागते. एखादी रेष छोटी करायची असेल तर त्यासमोर दुसरी मोठी रेष आखायला हवी या म्हणण्यानुसार मी ही दुःखाची रेष कमी करण्यासाठी काय करू शकतो याचा विचार केला आणि या र्‍हासाच्या रेषेला छोटं करायचा असेल तर निर्मितीची मोठी रेष त्यापुढे आखायला हवी हे ठरवलं.आजवर ज्यांच्या ज्यांच्या फोटोवर भावपूर्ण श्रद्धांजली लिहावं लागलं आहे त्यांच्या त्यांच्या नावानं एक एक झाड लावावं असं ठरवले. आपणही हे नक्की करून पहा. आता फेसबुकची वॉल नवनिर्मितीने भरू. यात एक झाड लावून त्या सोबतचा एक सेल्फी अपलोड करूयात चैतन्याची पालवी फुटू देऊयात.एक झाड आपल्या प्रियजनांच्या आठवणीसाठी  लावूयात हीच खरी त्यांना श्रद्धांजली असेल, अशा शब्दांत मुनोत यांनी भावना व्यक्त केल्या.

No comments:

Post a Comment