नयन तांदळे टोळीवर मोक्का अंतर्गत कारवाई. - Nagari Davandi : Breaking & Latest Marathi News Live, Marathi News Updates

Breaking

Post Top Ad

Responsive Ads Here

Friday, May 21, 2021

नयन तांदळे टोळीवर मोक्का अंतर्गत कारवाई.

 नयन तांदळे टोळीवर मोक्का अंतर्गत कारवाई.

डीवायएसपी संदीप मिटकेंकडे तपास वर्ग.


अहमदनगर -
मालमत्ताविषयक गुन्हे दाखल असणार्‍या कुप्रसिद्ध नयन तांदळे टोळीवर महाराष्ट्र संघटित गुन्हेगारी नियंत्रण कायदा (मोक्का) अंतर्गत कारवाई करण्याचा प्रस्ताव नाशिक विशेष पोलीस महानिरीक्षक यांच्याकडे सादर करण्यात आला होता. या प्रस्तावास मंजुरी मिळाली असून या गुन्ह्याचा तपास डीवायएसपी संदीप मिटके यांचे कडे वर्ग करण्यात आला आहे.
सुपा पोलीस स्टेशन येथे फिर्यादी अक्षय चखाले रा. निगडी , पुणे यांनी उी. छे. 504/ 2020 खझउ 395, 341 नुसार गुन्हा दाखल केला होता, हा गुन्हा कुप्रसिद्ध नयन तांदळे टोळीने केल्याचे निष्पन्न झाल्यानंतर नयन तांदळे सह टोळीतील अन्य 4 सदस्यांना अटक करण्यात आली होती. नयन तांदळे टोळी ही कोणताही कामधंदा न करता संघटीत पणे बेकायदेशररित्या स्वतःच्या आर्थिक फायद्या करिता हिंसाचाराचा वापर करून , हिंसाचार करण्याची धमकी देऊन तसेच धाक दपटशहा  दाखवून जबरदस्तीने जबरी चोरी, दरोडा टाकून दहशत करीत होती.
या गुन्ह्याची गांभीर्याने दखल घेऊन  मनोज पाटील( पोलीस अधिक्षक), सौरभ अग्रवाल, अजित पाटील यांनी या गुन्ह्यास मोक्का अंतर्गत कारवाई करण्याचा प्रस्ताव    विशेष पोलीस महानिरीक्षक नाशिक यांना सादर केला होता. या प्रस्तावास त्यांनी मंजुरी दिली आहे. या टोळीवर या पूर्वी सुपा, तोफखाना पोलीस ठाण्यात गुन्हे दाखल आहेत.
पुढील तपास मनोज पाटील पोलिस अधीक्षक, सौरभ अग्रवाल यांच्या मार्गदर्शन खाली ऊूीि संदीप मिटके हे करीत असून त्यांना झख नितीन गोकावे, झछ अमोल धामणे, झछ साहेबराव ओव्हाळ, झउ यशवंत ठोंबरे यांचे पथक सहाय्य करीत आहे.

No comments:

Post a Comment

Post Bottom Ad

Responsive Ads Here