तलाठ्यास मारहाण दोघांवर गुन्हा दाखल - Nagari Davandi : Breaking & Latest Marathi News Live, Marathi News Updates

Breaking

Post Top Ad

Responsive Ads Here

Friday, May 21, 2021

तलाठ्यास मारहाण दोघांवर गुन्हा दाखल

 तलाठ्यास मारहाण दोघांवर गुन्हा दाखल


राहुरी -
फेरफार उतार्‍यावरून वाद होऊन राहुरी तालुक्यातील मानोरी येथील तलाठी राहुल कराड यांनी वसंत आढाव व वैभव आढाव यांच्यावर गुन्हा दाखल करण्यात आला आहे.
याबाबत अधिक माहिती अशी की फिर्यादीत म्हटल्यानुसार, आरोपी वसंत आढाव, वैभव आढाव, दोघे राहणार मानोरी यांनी गुरूवारी दुपारी तलाठी कार्यालयात येऊन गट नंबर 188/अ या गटावरील शर्त खरेदी फेरफार नं. 846 हा मला कमी कर द्या असे म्हणाले.त्यांना फिर्यादी तलाठी कराड म्हणाले की सदर फेरफार हा मुळात रद्द असल्याने कमी करण्याचा प्रश्न उदभवत नाही. तसेच तशी ऑनलाईन ई फेरफार प्राणाली मध्ये सुविधा देखील उपलब्ध नाही,असे समजावुन सांगत असताना त्याचा राग येवुन आरोपी यांनी शिवीगाळ करून गंचाडी धरून मारहाण केली तसेच टेबल वरील लॅपटॉप व प्रिटर यांचे देखील नुकसान केले.तसेच पोलिसात तक्रार केली तर तुमच्या विरूध्द अ‍ॅट्रोसिटी दाखल करील अशी धमकी देखील दिली असल्याचे फिर्यादीत म्हटले आहे. समाजामध्ये अनेकदा महसूल विभागाच्या कर्मचार्‍यांना मारहाण झाल्याच्या घटना घडताना दिसतात. या आधीही अहमदनगर जिल्ह्यात असे प्रकार घडले आहेत. अनेकदा यावर कडक कायद्याचा धाक दाखवूनही असे प्रकरणे अद्यापही कमीअधिक प्रमाणात सुरु असल्याचे चित्र आहे. वसंत आढाव, वैभव आढाव या दोघांविरोधात भा.दं.वि कलम-353, 332, 504, 506, 188, 269, 34 प्रमाणे गुन्हा दाखल करण्यात आला आहे.

No comments:

Post a Comment

Post Bottom Ad

Responsive Ads Here