कारागृहात मोबाईल सापडल्यामुळे बोठेचा मुक्काम नगर कारागृहात..... - Nagari Davandi : Breaking & Latest Marathi News Live, Marathi News Updates

Breaking

Post Top Ad

Tuesday, May 4, 2021

कारागृहात मोबाईल सापडल्यामुळे बोठेचा मुक्काम नगर कारागृहात.....

 कारागृहात मोबाईल सापडल्यामुळे बोठेचा मुक्काम नगर कारागृहात.....नगरी दवंडी

अहमदनगर –  रेखा जरे हत्याकांड प्रकरणातील मुख्य आरोपी पत्रकार बाळ बोठेच्या पहिल्याच आयफोनचे लॉक अदयाप उघडलेले नसताना त्याला ठेवण्यात आलेल्या कोठडीमध्ये मोबाईल आढळून आल्याने बाळ बोठेच्या मनामध्ये कोणतही भिती नसल्याचे सिद्ध झाले आहे. त्यामुळे बोठे यास पारनेर येथील दुययम कारागृहात ठेवणे घातक ठरू शकते.

पत्रकार बाळ बोठे याच्यासारख्या अटटल गुन्हेगारास नगर येथील कारागृहात हालविणे योग्य राहिल अशी निवंती मयत रेखा जरे यांचा मुलगा रूणाल जरे तसेच त्यांचे वकील सचिन पटेकर यांनी पोलिस अधिक्षक मनोज पाटील यांच्याकडे केली आहे. सोमवारी पोलिस अधिक्षकांना देण्यात आलेल्या निवेदनात नमुद करण्यात आले आहे की, बोठे पारनेर येथील ज्या कोठडीत आहे, त्या कोठडीतील दोन आरोपींकडे मोबाईल आढळून आले आहेत. कारागृहातील पाणी बाहेर जाण्याच्या पाईमध्ये ते ठेवण्यात आल्याची माहीतीही चौकशीत पुढे आली आहे. यासंदर्भात पारनेर पोलिस ठाण्यात गुन्हाही दाखल करण्यात आला आहे.

या कोठडीत असलेल्या पत्रकार बाळ बोठे याच्यावर रेखा जरे यांच्या हत्येसह खंडणी तसेच विनयभंगाचा गुन्हा दाखल असून तो सध्या न्यायालयीन कोठडीत आहे. या कोठडीतील आरोपींकडील मोबाईल बोठे यानेही वापरल्याचा संशय जरे व पटेकर यांनी या निवेदनात व्यक्त केला आहे. बोठे याने हा फोन वापरून आणखी दुसरे काही नियोजन तर केले नसावे ना ? कोणाकोणास संपर्क साधण्यासाठी त्याने हा मोबाईल वापरला असेल ? जरे यांच्या हत्याकांडात वापरलेला मोबाईल पोलिसांनी जप्त केला आहे. त्याचे लॉक उघडत नसल्याने पोलिसांनी तो फॉरेन्सीक लॅबकडे पाठविला आहे. त्याचा अहवाल अद्याप पावेतो येणे बाकी आहे.

No comments:

Post a Comment