उद्यापासून नगर शहरात काय सुरु, काय बंद?...!मनपा आयुक्तांचे आदेश जारी - Nagari Davandi : Breaking & Latest Marathi News Live, Marathi News Updates

Breaking

Post Top Ad

Sunday, May 16, 2021

उद्यापासून नगर शहरात काय सुरु, काय बंद?...!मनपा आयुक्तांचे आदेश जारी

 उद्यापासून नगर शहरात काय सुरु, काय बंद?...!मनपा आयुक्तांचे आदेश जारी



नगरी दवंडी

अहमदनगर प्रतिनिधी-नगर मध्ये कोरोना रुग्णांनाची संख्येत वाढ होताना दिवस आहे. कोरोनाचा प्रादुर्भाव झपाट्याने वाढत चालला आहे. कोरोनाची ही साखळी तोडण्यासाठी उपाययोजन म्हणून आज सायंकाळी सुधारित आदेश जारी केला आहे.


हे राहणार चालू

१.वैद्यकीय सेवा / औषध दुकाने सुरु राहील.

२.अत्यावश्यक सेवेसाठी पेट्रोल पंप नियमित वेळेनुसार सुरु राहतील.

३.घरपोहोच गैस वितरण सेवा सुरु राहील.

४.सर्व बँका सुरु राहतील.

५.दुध व दुग्धजन्य पदार्थ विक्री फक्त सकाळी ७:०० ते ११:०० सुरु राहील.

६.पशुखाद्य विक्री सकाळी ७:०० ते ११:०० सुरु राहील.


हे राहणार बंद......!

१.किराणा दुकाने / तदनुषंगीक मालाची खरेदी-विक्री करणे बंद राहील.

२.भाजीपाल व फळे बाजार मालाची खरेदी-विक्री करणे बंद राहील.

३.सर्व खाजगी आस्थापना पुर्णतः बंद राहतील.

४.अंडी, मटन, चिकन व मत्स्य विक्री बंद राहतील असे आदेशात नमूद केले आहे.1 जून पर्यत हे सर्व चालू आणि बंद राहील.

No comments:

Post a Comment