बास्को ग्रामीण विकास केंद्र अंतर्गत बाळेवाडी येथे स्टीमरचे वाटप - Nagari Davandi : Breaking & Latest Marathi News Live, Marathi News Updates

Breaking

Post Top Ad

Sunday, May 16, 2021

बास्को ग्रामीण विकास केंद्र अंतर्गत बाळेवाडी येथे स्टीमरचे वाटप

 बास्को ग्रामीण विकास केंद्र अंतर्गत बाळेवाडी येथे स्टीमरचे वाटप



नगरी दवंडी

चिचोंडी पाटील : (वार्ताहर)

बॉस्को ग्रामीण विकास केंद्र अंतर्गत जगभरात थैमान घालत असलेल्या कोरोना विषाणूचा वाढता प्रादुर्भाव कमी करण्यासाठी नगर तालुक्यातील बाळेवाडी येथे वाफ घेण्यासाठी मशीन (स्टीमर) चे वाटप करण्यात आले.

दिवसेंदिवस ग्रामीण भागात कोरोणाचा शिरकाव वाढत चालला आहे.गावोगावी कोरोना चे रुग्ण वाढत आहेत.यामुळे बाळेवाडी येथे वाफ घेण्याच्या मशीन (स्टीमर) चे वाटप करत आहोत अशी माहिती बास्को ग्रामीण विकास केंद्राचे संचालक फा.जॉर्ज डिआबिओ, उपसंचालक फा.नेल्सन मुडलियार यांनी दिली.तसेच आत्तापर्यंत रांजणी, माथनी,आगडगाव येथे प्रत्येक कुटुंबाला एक स्टीमर देण्याचा उपक्रम केला आहे.अजून ४ हजार स्टीमर बास्को ग्रामीण विकास केंद्राच्या माध्यमातून वाटणार आहोत.यासाठी सभापती संदीप गुंड यांचे मोलाचे योगदान,सहकार्य मिळत आहे.असे फा.जॉर्ज डिआबिओ यांनी सांगितले.बाळेवाडी गावात जंतुनाशक औषध फवारणी करण्यात आली.

याप्रसंगी पंचायत समिती नगरचे सभापती संदीप गुंड,सरपंच मंज्याबापू घोरपडे,माजी सरपंच हरी पालवे,अनिल पालवे,पप्पू घुले,गणेश सानप,रामदास पालवे,अशोक कांडेकर, सर्जेराव ढोबे, नितीन पालवे आदी उपस्थित होते.

No comments:

Post a Comment