निघोजमध्ये लाळगेमळात टँकरने पाणीपुरवठा. - Nagari Davandi : Breaking & Latest Marathi News Live, Marathi News Updates

Breaking

Post Top Ad

Responsive Ads Here

Monday, May 17, 2021

निघोजमध्ये लाळगेमळात टँकरने पाणीपुरवठा.

 निघोजमध्ये लाळगेमळात टँकरने पाणीपुरवठा.नगरी दवंडी

निघोज- निघोज ग्रामपंचायत मधील  वाॕर्ड क्र.६ मध्ये पिण्याच्या पाण्यासाठी नागरिकांना वणवण भटकावे लागत होते.हे लक्षात आल्यानंतर  ग्रामपंचायत सदस्या सुधामती कवाद,सदस्य गणेश कवाद, दिगंबर लाळगे यांनी एकत्र येवुन खाजगी विहिरीचे मालक बाळासाहेब शंकर लाळगे  यांना विनंती करुन सबंधित विहिरीचे पाणी स्वखर्चाने टँकरच्या साहाय्याने वाटप करण्यात येत आहे.प्रभाग ६ ची कायमस्वरुपी पाणीटंचाई मिटावी म्हणुन लवकर नवीन विहिर व पाणीसाठ्याचा प्रस्ताव लवकरच  सादर करणार असल्याची माहीती सहानंबर मधील ग्रामपंचायत सदस्यांनी दिली.   यासाठी  पाणीविटपासाठी माजी सरपंच ठकाराम लंके , मळगंगा प्रतिष्ठानचे अध्यक्ष विठ्ठलराव कवाद,संदिप लाळगे ,युवा सामाजिक कार्यकर्ते   विठ्ठल कवाद ,नवनाथ लाळगे,राजु  ढवळे ,सतिश राऊत,नवनाथ लाळगे,विठ्ठल शेटे,दिपक लाळगे,यश (सार्थक) लाळगे,स्वराज कवाद यांचे सहकार्य लाभत आहे.

          कोरोनाच्या काळात पाण्यासाठी भटकंतीची वेळ येवु नये.कारण भटकंटी मुळेही कोरोना पसरु शकतो असे नागरिकांनी बोलुन दाखविले. पाणीटंचाई काळात ग्रामपंचायत सदस्य स्वखर्चाने पाणी वाटप करत असल्यामुळे ग्रामस्थांनी समाधान व्यक्त केले.

No comments:

Post a Comment

Post Bottom Ad

Responsive Ads Here