पोलिसांना कडक लॉकडाउनचे अधिकार-गृहराज्य मंत्री देसाई यांनी केले स्पष्ट - Nagari Davandi : Breaking & Latest Marathi News Live, Marathi News Updates

Breaking

Post Top Ad

Sunday, May 2, 2021

पोलिसांना कडक लॉकडाउनचे अधिकार-गृहराज्य मंत्री देसाई यांनी केले स्पष्ट

 पोलिसांना कडक लॉकडाउनचे अधिकार-गृहराज्य मंत्री देसाई यांनी केले स्पष्ट



नगरी दवंडी

 नगर प्रतिनिधी 

राज्यभरामध्ये करोना रुग्ण संख्या वाढत असल्यामुळे आता दुसऱ्या टप्प्यामध्ये कडक लॉक डाऊन करण्याचे निर्देश येथील पोलीस प्रशासनाला दिले आहेत, तसेच हा लॉकडाऊन कसा राबवायचा याचा अधिकारही स्थानिक पोलीस अधिकाऱ्यांना दिला असल्याचे वक्तव्य राज्याचे गृहराज्यमंत्री शंभूराजे देसाई यांनी आज पत्रकारांशी बोलताना केले. दरम्यान, पोलीस अधिकाऱ्यांना जो दहा टक्के इंजेक्शन-बेड व अन्य आरोग्य सुविधा राखीव ठेवण्याचा निर्णय घेण्यात आलेला होता त्यासंदर्भात आता यात त्यांच्या नातेवाईकांना सुद्धा समावेश करता येईल का व 10 टक्के कोट्यातून शिल्लक राहिले तर त्यात पोलीस कुटुंबीयांचा समावेश करता येईल का या संदर्भात आरोग्य मंत्री यांच्याशी तात्काळ चर्चा करणार असल्याचेही देसाई यांनी यावेळी सांगितले


मंत्री देसाई यांनी नगर जिल्ह्यामध्ये आज पोलीस अधीक्षक कार्यालयामध्ये जिल्ह्याच्या पोलीस दलातील कोविड आढावा घेतला. त्यानंतर ते बोलत होते. यावेळी जिल्हा पोलीस अधीक्षक मनोज पाटील, अप्पर पोलीस अधीक्षक सौरभ अग्रवाल आदींसह अधिकारी यावेळी उपस्थित होते


मंत्री शंभूराजे देसाई म्हणाले की राज्यभरामध्ये रुग्ण संख्या मोठ्या प्रमाणावर वाढत चाललेली आहे . त्यामुळे आता दुसरा लाटेमध्ये राज्य सरकारने लॉकडाऊन जाहीर केलेला आहे. त्याची काटेकोरपणे अंमलबजावणी करण्याचे निर्देश सर्व पोलिसांना दिलेले आहेत. नुकतेच मी अमरावती, जालना, संभाजीनगर आदी भागांमध्ये जाऊन बैठका घेतल्या आहेत. तेथे सुद्धा अशा प्रकारचे निर्देश देण्यात आलेले आहेत. नगर जिल्ह्यामध्ये दुसऱ्या टप्प्यामध्ये रुग्ण वाढ ही मोठ्या प्रमाणात दिसून येत आहे म्हणून आता दुसऱ्या टप्प्यामध्ये कडक लॉक डाऊन करण्याशिवाय पर्याय राहणार नाही त्यामुळे त्याची काटेकोरपणे अंमलबजावणी करण्याचे निर्देश येथील पोलीस प्रशासनाला दिले असल्याचे मंत्री देसाई यांनी यावेळी सांगितले.

कोविडच्या काळामध्ये पोलीस दलातील आणि कर्मचारी व अधिकाऱ्यांना कोरोनाची लागण झालेली आहे ही वस्तुस्थिती आहे . इंजेक्शन चा साठ्यातील 10% इंजेक्शन हे पोलीस दलातील जे रुग्ण असतील, त्यांना देण्याचा निर्णय घेण्यात आलेला होता. आता या कोट्यातील जर इंजेक्शन शिल्लक राहत असेल तर ते इंजेक्शन त्यांच्या कुटुंबियांना देता येईल का या संदर्भामध्ये आजच राज्याचे आरोग्य मंत्री राजेश टोपे यांच्याशी चर्चा करून याबाबत लवकरच निर्णय घेणार असल्याचे त्यांनी यावेळी सांगितले.

अत्यावश्यक सेवेतील पोलीस दलातील कर्मचारी व अधिकाऱ्यांना कोरोनाची लागण झालेले आहेत, त्यांना आमच्या पॅनलवर जे रुग्णालय आहे, तेथे तात्काळ उपचार मिळत आहे.त्यामध्ये कुठेही कमतरता पडत नाही, असेही मंत्री देसाई यांनी यावेळी सांगितले. आजपर्यंत ज्या ज्या मी बैठका घेतलेल्या आहेत, त्या त्या संदर्भातील सर्व बाबींची माहितीही त्यादिवशी राज्याचे मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांना दिलेली आहे असेही देसाई यांनी यावेळी सांगितले.


काम करताना जर एखाद्या कर्मचाऱ्याचा मृत्यू झाला तर त्याच्या कुटुंबाला पन्नास लाख रुपये देण्याचा निर्णय या अगोदरच्या पहिल्या कोविड लाटेच्यावेळी मध्ये घेण्यात आलेला होता.  त्यानंतर  तो थांबवण्यात आला होता पण आता पुन्हा नव्याने तसा आदेश काढला जाणार आहे, कॅबिनेटने सुद्धा या विषयाला मंजुरी दिली असून त्याची सुद्धा लवकरच अंमलबजावणी होईल असेही मंत्री देसाई यांनी यावेळी स्पष्ट केले.राज्यभरामध्ये पोलीस विभागाने व आरोग्य विभागाने संयुक्तपणे कारवाई करून ज्या ज्या ठिकाणी इंजेक्शन साठा हस्तगत केलेला आहे,  या बाबत आता जप्त केलेले इंजेक्शन हे स्थानिक पातळीवर पुन्हा रुग्णांना वाटण्याच्या संदर्भामध्ये जिल्हाधिकारी व पोलीस अधिकाऱ्यांनी निर्णय घ्यायचा आहे व त्याबाबत ते निर्णय घेतील असेही मंत्री देसाई यांनी यावेळी सांगितले.


पोलीस भरती होणार

पोलीस भरती बाबत शासन निर्णय आम्ही मार्च-एप्रिलमध्ये घेतला होता, पण त्या वेळात कोरोना वातावरण असल्यामुळे त्या वेळेला  आरोग्य विभाग याला प्रायोरिटी देऊन त्या ठिकाणी निधी आम्ही दिलेला होता. त्यामुळे ती भरतीप्रक्रिया त्या वेळेला होऊ शकली नव्हती. मात्र, आता कॅबिनेटने नवीन भरती प्रक्रियेला मंजुरी दिली असून पोलिसांची भरती प्रक्रिया सध्या सुरू असल्याचेही देसाई यांनी यावेळी सांगितले.

नगरचे काम उत्तम

नगर जिल्ह्यामध्ये आज मी जिल्ह्याचा आढावा घेतलेला आहे येथील पोलिस प्रशासनाने पूर्वीच्या काळामध्ये केलेल्या कामाची सर्व माहिती घेण्यात आलेली आहे. नगर पोलिसांनी केलेले काम हे अतिशय समाधानकारक आहे, असेही मंत्री देसाई यांनी यावेळी सांगितले.

No comments:

Post a Comment