२४ तास कार्यरत असते आमदार लंके यांची यंत्रणा ! - Nagari Davandi : Breaking & Latest Marathi News Live, Marathi News Updates

Breaking

Post Top Ad

Sunday, May 2, 2021

२४ तास कार्यरत असते आमदार लंके यांची यंत्रणा !

 २४ तास कार्यरत असते आमदार लंके यांची यंत्रणा !

भाळवणी येथील कोव्हीड सेंटर : १२ तासांच्या पाळीत असतो १०० कार्यकर्त्यांचा समावेशनगरी दवंडी


पारनेर : प्रतिनिधी -

देश विदेशामध्ये चर्चेत असलेल्या आमदार नीलेश लंके यांच्या नेतृत्वाखालील शरदचंद्र पवार आरोग्य मंदीरामध्ये रूग्णांची काळजी करण्यासाठी आ. लंके यांची यंत्रणा २४ तास कार्यरत असते. प्रत्येकी १२ तासांच्या पाळीमध्ये १०० कार्यकर्ते शौचालयांच्या सफाईपासून रूग्णांच्या सुश्रुषेपर्यंत सर्व काळजी घेतात.  आ. नीलेश लंके हे देखील आहोरात्र रूग्णांच्या सहवासात असतात.

कोरोना बाधित रूग्ण आरोग्य मंदीराच्या प्रवेश द्वाराजवळ आल्यानंतर तेथे उपस्थित कार्यकर्ते रूग्ण तसेच त्याच्या नातेवाईकांना धिर देण्याचा प्रयत्न करतात. रूग्णाच्या विविध चाचण्यांच्या कागदपत्रांची तपासणी करून नोंदवहीमध्ये त्याची नोेंद केली जाते. प्रत्यक्ष कोव्हीड सेंटरमध्ये रूग्ण गेल्यानंतर तेथे उपस्थित डॉक्टर चाचण्यांच्या कागदपत्रांची तपासणी करून, त्याच्या ऑक्सीजनची पातळीही तपासली जाते. ऑक्सीजनच्या पातळीप्रमाणे सामान्य किंवा ऑक्सीजन बेडवर रूग्णाला पाठविले जातेे. रूग्णासोबत आवश्यक ती औषधेही दिली जातात. वेळेनुसार दाखल झालेल्या रूग्णास चहा, नास्ता, जेवण तात्काळ दिले जाते. एखाद्या रूग्णाची ऑक्सीजन पातळी अधिकच खालावणी तर त्यास नगर येथील शासकिय रूग्णालय, बुथ हॉस्पिटल किंवा खाजगी रूग्णालयात हालविण्यात येते. आ. नीलेश लंके हे त्या रूग्णास बेड उपलब्ध करून देण्याची स्वतः काळजी घेतात.

दररोज आ. लंके हेे आरोग्य मंदीरात दाखल झाल्यानंंतर पहाटे एक ते दिड वाजेपर्यंत ते रूग्णांच्याच सहवासात असतात. रूग्णांची ऑक्सीजन पातळी तपासणी करणे, त्यांच्या प्रकृतीची चौकशी करणे, सकारात्मक चर्चा करून त्यांच्यामध्ये आत्मविश्‍वास निर्माण करण्याची भुमिका आ. लंके हे यशस्वीपणे पार पाडतात. दिवसभरात तिन वेळा तेथेे उपस्थित डॉक्टर रूग्णांची तपासणी करतात. रूग्णांसाठी सकाळी योगा, प्राणायाम, सायंकाळी प्रबोधनात्मक प्रवचन मनोरंनासाठी ऑक्रेस्ट्रा आदी कार्यक्रमांचे कार्यकर्त्यांकडून आयोजन करण्यात येते.

  आरोग्य मंदीरातील शौचालयांची सफाई करणे, जंतूनाशकाची फवारणी करणे, आरोग्य मंदीरातील सफाई किंवा जे पडेल ते काम आ. लंके यांचे कार्यकर्ते निःस्पृह भावनेतून करतात. त्यासाठी प्रत्येकी १०० कार्यकर्त्यांना १२ तासांच्या पाळया ठरवून देण्यात आल्या असून आ. लंके यांच्या निष्ठेपोटी हे कार्यकर्ते पडेल ते काम मोठया हौसेने करीत असल्याचे चित्र या सेंटरमध्ये पहावयास मिळते.


वृद्ध रूग्णांना लागला लळा !

 कोरोनावर मात केलेल्या अनेक वृद्धांना या आरोग्य मंदीराचा, आ. नीलेश लंके यांचा लळा लागला  असून ते तेथून घरी जाण्यास धजावत नाहीत. आम्हाला येथेच ठेवा, आम्ही आनंदात जिवन जगत आहोत. वृद्धाश्रमाप्रमाणे आम्ही जमेत तेवढे कामही करू असे सांगत हे वृद्ध तेथेच ठेवण्याचा आग्रह धरीत असल्याचेही अनुभव कार्यकर्त्यांना आले आहेत.


अधिकारी वर्गाचेही मोलाचे योगदान

प्रांताधिकारी सुधाकर भोसले, तहसिलदार ज्योती देवरे, गटविकास अधिकारी किशोर माने, तालुका आरोग्य अधिकारी डॉ. प्रकाश लाळगे पोलिस निरीक्षक घनश्याम बळप हे प्रशासनातील अधिकारीही या आरोग्य केंद्रातील सुविधांसाठी २४ तास सतर्क असतात. दिवसभरात दर तासाला त्यांच्याकडून तेथील परिस्थितीचा आढावा घेतला जातो.

No comments:

Post a Comment