नगरकरांनी निर्बंध पाळल्यामुळे कोरोना रुग्ण संख्येत घट - आ. जगताप - Nagari Davandi : Breaking & Latest Marathi News Live, Marathi News Updates

Breaking

Post Top Ad

Responsive Ads Here

Tuesday, May 18, 2021

नगरकरांनी निर्बंध पाळल्यामुळे कोरोना रुग्ण संख्येत घट - आ. जगताप

 नगरकरांनी निर्बंध पाळल्यामुळे कोरोना रुग्ण संख्येत घट - आ. जगताप

ऑक्सीजन युक्त आयसीयू सेंटरचा उद्योजक नरेंद्र फिरोदिया यांच्या हस्ते शुभारंभ

कोरोना संकट काळामध्ये मनपाने मानवता हाच धर्म समजून वर्षभर मोठे काम केले आहे. काही जन मनपाला  नांवे ठेवण्याचे काम करतात. त्याने नांवे ठेवून निगेटिव्ह बोलण्यापेक्षा चांगल्या कामाकडे पहावे आम्ही चांगले काम उभे केले आहे. या वेदना देणा-या काळामध्ये प्रत्येकाने आपली भूमिका पार पाडावी. मनपाने कधीही दुजाभाव न करता जिल्हयातील कोरोना रूग्णांना मदतीचा हात दिला. बुथ हॉस्पीटल मधील सर्व कोरोना रूग्णांचे बील मनपाने 1 कोटी 90 लाख रूपये दिले आहे. - बाबासाहेब वाकळे, महापौर

आ. संग्रामभैय्या जगताप यांनी कोरोनाच्या संकट काळामध्ये आपली भुमिका यशस्वीपणे पार पाडली आहे. 1 वर्षा पासून आरोग्य सेवेत पुढे राहून कोरोना रूग्णांना मदतीचा हात देण्याचे काम केले आहे. कोरोनाच्या तिसर्‍या लाटेसाठी प्रत्येकाने सतर्क राहण्याची गरज आहे. या लाटेमध्ये तज्ञांच्या सुचनेनुसार लहान मुलांवर परिणाम होणार आहे. तरी प्रत्येकाने मुलांची काळजी घेणे गरजेचे आहे. एकजुटीने मुकाबला करून कोरोनाची लढाई आत्मविश्वासाने जिंकायची आहे. सर्वांनी लसीकरण करून घेण्यासाठी पुढे यावे. - नरेंद्र फिरोदिया, उद्योजक


नगरी दवंडी/प्रिंतनिधी
अहमदनगर ः नगरकरांनी शासनाने जाहीर केलेले निर्बंध पाळल्यामुळे कोरोना रुग्ण संख्या 100 पर्यंत आली असून कोरोना रुग्ण संख्येत कमालीची घट झाली आहे. संशोधकांनी तिसर्‍या लाटेचा इशारा दिला आहे. या लाटेत ऑक्सिजनची कमतरता पडू नये यासाठी ऑक्सिजनयुक्त सुविधा असलेले आयसीयू सेंटर आपण सुरू केले आहे. कोरोना च्या तिसर्‍या लाटेला आपण सर्व भक्कम पणे आत्मविश्वासाने परतवून लावू असा विश्वास आ.संग्राम जगताप यांनी व्यक्त केला.
गंगाधर शास्त्री गुणे आयुर्वेद कॉलेज येथे जय आनंद फौडेशनच्या विशेष सहयोगातून व मनपा संचलीत ऑक्सिजन सुविधा असलेले नविन आयसीयु विभागाचा शुभारंभ उदयोजक मा.श्री.नरेंद्र फिरोदिया यांच्या हस्ते संपन्न झाला. याप्रसंगी ते बोलत होते.
आ. जगताप पुढे म्हणाले की, गेल्या 1 वर्षापासून मानवी जीवनावर कोरोनाचे महाभयंकर संकट आले आहे. या कोवीडच्या संकट काळामध्ये नगर शहरातील सामाजिक संस्था, दानशूर व्यक्ती, मनपा प्रशासन यांनी महत्वाची भूमिका पार पाडली आहे. वर्षभरापासून शहरातील डॉक्टर्स, आरोग्य सेवक, मनपाची आरोग्य यंत्रणा, कोवीड सेंटर चालविणार्‍या खाजगी व्यक्ती, संस्था यांनी कोरोना रूग्णांवर उपचारासाठी प्रयत्नाची परकाष्ठा केली अनेकांचे प्राण वाचविले. काही दुर्देवी घटना सोडता नगर शहरातील नागरिकांनी कोरोनाला आत्मविश्वासाने पराभूत केले.
उदयोजक नरेंद्र फिरोदिया यांनी मानवतेच्या भावनेतून गेली एक वर्ष सामाजिक बांधिलकी जोपासत बुथ हॉस्पीटल येथे कोरोना रूग्णांना मोफत जेवण देण्याचे काम करित आहे. तसेच प्लाझमा निर्मिती मशिन रक्तपेढीला भेट दिली. आदीसह विविध कामासाठी नेहमीच ते मदत करित असतात. तज्ञांच्या इशारा नुसार कोरोनाची तिसरी लाट येणार आहे.
या लाटेला थांबविण्यासाठी पूर्व तयारी करणे गरजेचे आहे. या पार्श्वभूमीवर आयुर्वेद महाविद्यालय येथे जय आनंद फौडेशनच्या विशेष सहयोगातून व मनपा संचलीत ऑक्सिजन सुविधा असलेले नविन आयसीयु विभागाचा शुभारंभ केला आहे. लवकरच या ठिकाणी हवेतून ऑक्सीजन निर्मितीचा प्लॅट सुरू होणार आहे. आपण केलेल्या कामाच्या माध्यमातून जनतेचा विश्वास संपादन केलेला आहे. नगर शहरात कधीही केलेल्या कामाची फोटोबाजी होत नाही पण प्रत्यक्षात काम करून दाखविले जाते. कोरोनाच्या संकट काळामध्ये आरोग्य यंत्रणा कमी पडत असताना या आपत्कालीन परिस्थितीमध्ये जीव वाचविणे व मानसिक आधार देण्याचे काम केले आहे.  कोरोनाची लढाई जिंकण्यासाठी सर्वांच्या सहकार्याची खरी गरज आहे असेही जगताप म्हणाले.
यावेळी आ. संग्रामभैय्या जगताप, महापौर बाबासाहेब वाकळे, आयुक्त शंकर गोरे, उदयोजक नरेंद्र बाफना, उदयोजक राजेश कटारिया, नगरसेवक विपुल शेटीया, कमलेश भंडारी, रितेश पारख, डॉ. पियुश मराठे, उपायुक्त यशवंत डांगे, आरोग्याधिकारी डॉ. अनिल बोरगे, सीए किरण भंडारी, संदेश कटारिया, अशोक गुगळे, पोपट भंडारी, वसंत बोरा, मयुर शेटीया, निलेश गुगळे, विशाल झंवर, वैभव गुगळे, शाम भुतडा, अनुद सोनीमंडलेचा गौरव बोरा, वैभव मेहेर, महावीर बोरा, गौतम गुथा आदी उपस्थित होते.

No comments:

Post a Comment

Post Bottom Ad

Responsive Ads Here