माणुसकीच्या भावनेतून तरी नगर-सोलापूर रोडवरील खड्डे बुजवा' - Nagari Davandi : Breaking & Latest Marathi News Live, Marathi News Updates

Breaking

Post Top Ad

Responsive Ads Here

Tuesday, May 18, 2021

माणुसकीच्या भावनेतून तरी नगर-सोलापूर रोडवरील खड्डे बुजवा'

 माणुसकीच्या भावनेतून तरी नगर-सोलापूर रोडवरील खड्डे बुजवा'

 स्लग -उपसभापती संतोष म्हस्के यांचे सां. बा. विभागाला साकडेनगरी दवंडी /प्रतिनिधी

अहमदनगर : रोडचे काम नाही तर कमीत कमी माणुसकीच्या भावनेतून तरी नगर -सोलापूर महामार्गावरील खड्डे बुजवा अशी आर्त मागणी  कृषी उत्पन्न समितीचे उपसभापती संतोष म्हस्के यांनी सार्वजनिक बांधकाम विभागाचे कार्यकारी अभियंता यांना निवेदनाद्वारे केली आहे.

म्हस्के यांनी निवेदनात म्हटले की, दक्षिणेला जोडणाऱ्या नगर सोलापूर महामार्गाचे काम गेल्या कित्येक दिवसांपासून राखडलेले आहे. जागोजागी मोठमोठे खड्डे पडले असून आत्तापर्यंत अनेक नागरिकांना खड्डे चुकविण्याच्या नादात आपला जीव गमवावा लागला आहे. दक्षिण भारतातून येणाऱ्या नागरिकांची शिर्डी शिंगणापूर येथे कायम ये जा असते. परंतु पावसामुळे रस्ता मोठया प्रमाणात खराब झाल्यास दक्षिण भारतातून  येणाऱ्या भाविकांना मोठा त्रास सहन करावा लागत आहे. रस्त्यावरून रात्रंदिवस मोठ्या प्रमाणात अवजड वाहतूक सुरु असते. वाळुंज, शिराढोण दहिगाव, साकत या परिसरात रोड लागतच्या साईड पट्ट्या दोन फुटापेक्षा खाली खचल्या आहेत. वाळुंज नजीक रेल्वे क्रॉसिंग जवळही मोठा खड्डा पडला असून ठीकठिकाणी वाहतूक कोंडीचा सामना करावा लागत आहे. दि.12 मे रोजी साकतखुर्द गावातील रहिवाशी परसराम शिवाजी (वय 18) या युवकला घरी जात असताना खड्डे चुकविण्याच्या नादात भरधाव वेगात जाणाऱ्या जड वाहनाने जागीच चिरडले. त्यामुळे याभागातील नागरिकांमध्ये मोठया प्रमाणात असंतोष पसरला होता. या विषयाचे गांभीर्य लक्षात घेऊन वाळुंज परिसरातील रस्त्यावरील खड्ड्यामुळे अपघाताला निमंत्रण अशी परिस्थिती रोडची झाली असल्याचे म्हस्के यांनी नमूद केले. यासंदर्भात नेतेमंडळी, नागरीक यांनी वेळोवेळी रस्ता रोको, उपोषण केले आहे. तरीही रोड बाबतीत अद्याप ठोस निर्णय झाला नसून निदान माणुसकीच्या भावनेतून तरी पावसाळ्यापूर्वी खड्डे बुजवावेत अशी साद उपसभापती संतोष म्हस्के यांनी निवेनाद्वारे घातली आहे.

No comments:

Post a Comment

Post Bottom Ad

Responsive Ads Here