हनीट्रॅप ः दुसरा गुन्हा दाखल 1 गजाआड 2 फरार - Nagari Davandi : Breaking & Latest Marathi News Live, Marathi News Updates

Breaking

Post Top Ad

Responsive Ads Here

Tuesday, May 18, 2021

हनीट्रॅप ः दुसरा गुन्हा दाखल 1 गजाआड 2 फरार

 हनीट्रॅप ः दुसरा गुन्हा दाखल 1 गजाआड 2 फरार

शरिरसंबधाचे आमीष दाखवुन अश्लील व्हीडीओ बनवुन धमकी देवुन 3 कोटींची मागणी


नगरी दवंडी/प्रिंतनिधी
अहमदनगर ः प्रेमाच्या जाळ्यात एका बागायतदारास ओढून ब्लॅकमेलिंग करून 1 कोटी रुपयांची मागणी करणार्‍या महिलेवर आज दुसरा ही गुन्हा दाखल करण्यात आला असून 1 आरोपीस पोलिसांनी अटक केली असून दोन आरोपी फरार आहे. काल रात्री उशिरा एका शासकीय नोकरीतील क्लासवन अधिकार्‍याने गुन्हा नोंदविला आहे. या महिलेने शरीर संबंधाचे आमिष दाखवून अशील व्हिडिओ बनवून 3 कोटी रुपयांची मागणी केल्याची फिर्याद दाखल केली आहे.

या गुन्ह्यातील आरोपींनी संगणमत करुन शरिरसंबधाचे अमिष दाखवून त्यांचेतील महिलेसोबत शरिरसंबध ठेवणेस भागपाडुन त्याचे अश्लील व्हीडीओ बनवला होता.आम्हास 3 कोटी रुपये आणुन दे नाहीतर सदर अश्लील व्हीडीओ हा पोलीसांना दाखवुन तुझ्यावर बलात्काराचा गुन्हा दाखल करेन अशी धमकी गुन्ह्यातील आरोपांनी दिली होती. या वेळी फिर्यादीच्या गाडीच्या डिक्कीत असणारे 30000 रुपये रोख व ऑनलाईन 50000 रुपये त्यांच्या नातेवाईकाच्या खात्यावर बळजबरीने वर्ग करुन घेतले  या गुन्ह्याचा तपास मा.पोलीस अधिक्षक श्री मनोज पाटील पो. व मा अपर पोलीस अधिक्षक श्री सौरभ कुमार अग्रवाल मा उपविभागिय पोलीस अधीकारी अजित पाटील यांचे मार्गदर्शना खाली सहाय्यक पोलीस निरीक्षक राजेन्द्र सानप नगर तालुका पोलीस स्टेशन हे करीत आहेत. आज सहाय्यक पोलीस निरीक्षक राजेद्र सानप यांनी पोलीस पथकासह हमीदपुर येथे राहणारा आरोपी नामे सचिन भिमराज खेसे यास ताब्यात घेवुन त्यास विश्वासात घेवुन विचारपुस केली असता गुन्हा हा त्याने व त्याचे साथीदार महिला व तिचे साथीदार अमोल सुरेश मोरे रा.कायनेटीक चौक अहमदनगर महेश बागले रा नालेगाव व अन्य 1  यांना सोबत घेवुन केल्याची कबुली दिली असता आरोपीनी फिर्यादीस चाकुचा धाक दाखवुन मारहाण करुन बलात्काराचा गुन्हा दाखल करण्याची धमकी देवुन 3 कोटी रुपयांची खंडणी मागितली होती, व एकुन 80000/- जबरदस्तीने लुबाडले होते. यापैकी1 आरोपी अटक असुन दुसर्‍याचा शोध सुरु आहे . आरोपीन्नो आणखी कोणास यापद्धतीने अमीष दाखवुन लुबाडले असले या बाबत तपास सुरु आहे नागरिकांनी कोणतीही भीती न बाळगता अशा प्रकारे शरिरसंबधाचे अमिष दाखवुन अश्लील व्हिडिओ बनवुन त्याची धमकी देवुन लुट झाल्यास अथवा पैशांची मागणी केली असल्यास तात्काळ पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्याचे आवाहन मा.पोलीस अधिक्षक श्री.मनोज पाटील सो.यांनी केले आहे . कारवाई मा.पोलीस अधिक्षक मनोज पाटील सो . व अपर पोलीस अधिक्षक सौरभ कुमार अग्रवाल उपविभागिय पोलीस अधीकारी अजित पाटील यांचे मार्गदर्शनाखाली सहाय्यक पोलीस निरीक्षक राजेद्र सानप व पथकातील पो उप.नि. आर एन राऊत, धनराज जारवाल, पोहेकॉ बापुसाहेब फोलाणे , संतोष लगड , पो.ना योगेश ठाणगे, भानुदास सोनवणे पो.कॉ धर्मराज दहिफळे , संभाजी बोराडे यांनी सदरची कारवाई केली असुन पुढील तपास सहाय्यक पोलीस निरीक्षक राजेद्र सानप हे करत आहेत.

No comments:

Post a Comment

Post Bottom Ad

Responsive Ads Here