पारनेर तालुक्यांमध्ये तीन गावांसाठी टँकर मंजूर- सभापती गणेश शेळके - Nagari Davandi : Breaking & Latest Marathi News Live, Marathi News Updates

Breaking

Post Top Ad

Responsive Ads Here

Monday, May 17, 2021

पारनेर तालुक्यांमध्ये तीन गावांसाठी टँकर मंजूर- सभापती गणेश शेळके

 पारनेर तालुक्यांमध्ये तीन गावांसाठी टँकर मंजूर- सभापती गणेश शेळके नगरी दवंडी

पारनेर प्रतिनिधी

तालुक्यांमध्ये काटाळवेढा, पिंपरी पठार ,पिंपळगाव रोठा, अशा तीन गावांचे प्रस्ताव प्रांत अधिकारी यांच्याकडे पाठवले होते त्यापैकी पिंपळगाव रोठा गावठाण, खंडोबा वाडी ,आदर्श वसाहत, घुले वस्ती व भांबरे वस्ती यासाठी एक टॅंकर ची खेप एकूण अकरा हजार लिटर पाणी पिंपरी पठार गावासाठी गावठाण व शिंदे वस्ती या ठिकाणी जवळपास आठ हजार लिटर पाणी एक खेप व कातळवेढा गावासाठी गावठाण, डोंगरवाडी चारणवाडी, दत्तवाडी, गव्हाणेवस्ती, घटाटे वस्ती यासाठी एकूण 30 हजार लिटर पाणी म्हणजे एकूण तीन खेपा मंजूर झालेल्या असून त्याचा नियमित पाणीपुरवठा चालू होईल अजूनही काही गावांचे प्रस्ताव पंचायत समिती मध्ये प्राप्त झालेले आहेत ते प्रस्ताव लवकरात लवकर पूर्ण करून पाठवले जातील व त्यालाही लवकरात लवकर टँकर मंजुरीचा आदेश प्रांताधिकारी यांच्यामार्फत दिला जाईल अशी माहिती सभापती गणेश शेळके यांनी दिली.

No comments:

Post a Comment

Post Bottom Ad

Responsive Ads Here