जनकल्याण रक्तपेढीत प्लाझ्मा संकलनाच्या अत्याधुनिक अफेरेसीस मशीनचे लोकार्पण - Nagari Davandi : Breaking & Latest Marathi News Live, Marathi News Updates

Breaking

Post Top Ad

Monday, May 17, 2021

जनकल्याण रक्तपेढीत प्लाझ्मा संकलनाच्या अत्याधुनिक अफेरेसीस मशीनचे लोकार्पण

 जनकल्याण रक्तपेढीत प्लाझ्मा संकलनाच्या अत्याधुनिक अफेरेसीस मशीनचे लोकार्पण

जास्तीतजास्त नागरिकांनी प्लाझ्मा दान करण्यासाठी पुढे यावे उद्योजक नरेंद्र फिरोदिया यांचे आवाहन



नगरी दवंडी

नगर –सध्या निर्माण झालेली परिस्थिती अजून किती वर्ष असेल हे सांगू शकत नाही. त्यामुळे सर्वांनी सजक राहून एकत्र काम केले पाहिजे. सेवाभावी जनकल्याण रक्तपेढीने जेव्हा जेव्हा मदत मागितली तेव्हा तेव्हा शांतीकुमारजी फिरोदिया मेमोरियल फाउंडेशनच्या वतीने त्वरित सहकार्य केले आहे. साध्य प्लाझ्माचा भासत असलेला तुटवडा दूर करण्यासाठी जनकल्याण रक्तपेढी मोठे कार्य करत आहे. प्लेटलेट, प्लाझ्मा या अनेक आजारांसाठी सतत लागत असतात. यासाठीच शांतीकुमारजी फिरोदिया मेमोरियल फाउंडेशनच्या वतीने तातडीने निर्णय घेवून स्वच्छ व चांगले काम करणाऱ्या जनकल्याण रक्तपेढीला अत्याधुनिक अफेरेसीस मशीन दिले आहे. या मशिनच्या माध्यमातून आता प्लाझ्मा संकलन आधीक वेगाने होईल. याचा फायदा जिल्ह्यातील जास्तीतजास्त रुग्णांना होणार असल्याने जास्तीतजास्त नागरिकांनी प्लाझ्मा दान करण्यासाठी पुढे यावे, असे आवाहन शांतीकुमार फिरोदिया मेमोरियल फाउंडेशनचे संचालक उद्दोजक नरेंद्र फिरोदिया यांनी केले.

शांतीकुमारजी फिरोदिया मेमोरियल फाउंडेशन व आय लव्ह नगरच्या वतीने जनकल्याण रक्तपेढीला रक्तातील प्लाझ्मा संकलन करण्यासाठी अत्याधुनिक अफेरेसीस मशीन भेट देण्यात आले. या मशीनचे लोकार्पण प्रसंगी नरेंद्र फिरोदिया बोलत होते. यावेळी आ.संग्राम जगताप, महापौर बाबासाहेब वाकळे, उद्दोजक विक्रम फिरोदिया, जनकल्याण रक्तपेढीचे अध्यक्ष राजेश झंवर, राष्ट्रीय स्वयंसेवक संघाचे प्रांत संघचालक नानासाहेब जाधव, जनकल्याण समितीचे राज्याचे प्रमुख डॉ.रवींद्र साताळकर, संघाचे शहर कार्यवाह हिराकांत रामदासी, रक्तपेढीचे संचालक डॉ.पंकज शहा, डॉ.दिलीप धनेश्वर, प्रवीण बजाज, प्रमोद सोनटक्के, राजेश परदेशी, अनिल धोकारीया, सुरेश रुणवाल आदी उपस्थित होते.

यावेळी आ.संग्राम जगताप म्हणाले, जनकल्याण रक्तपेढीने मागणी केल्यावर क्षणाचाही विचार न करता नरेंद्र फिरोदिया यांनी अफेरेसीस मशीनसाठी मदत केली आहे. या मशीनमुळे प्लाझ्माचा तुटवडा कमी होणार असल्याने त्यांना मी धन्यवाद देतो. गेल्या वर्षापासून गरजूंना सर्वप्रकारची मदत करताना नगर मधील शांतीकुमार मेमोरियल फाउंडेशन सारख्या विविध सामाजिक संघटना पुढे येवून केलेल्या मदत कार्यामुळे हे संकट लवकरात लवकर दूर होईल, असा विश्वास व्यक्त केला.

महापौर बाबासाहेब वाकळे म्हणाले, करोना बाधित अत्यवस्थ रुग्णांना प्लाझ्मा दिल्याने ते बरे होत आहेत. याची गरज ओळखून शांतीकुमार मेमोरियल फाउंडेशनच्या वतीने जनकल्याण रक्तपेढीला मिळालेल्या अत्याधुनिक अफेरेसीस मशीन मुळे आता कित्तेक नागरिकांचे प्राण वाचणार आहेत.

 प्रास्ताविकात राजेश झंवर म्हणाले, नगर जिल्ह्यात प्लाझ्माची सातत्याने मोठ्याप्रमाणात मागणी वाढत आहे. जनकल्याण रक्तपेढीत एकाच मशीनवर प्लाझ्मा संकलनाचे कार्य होत असल्याने मागणीच्या मानाने पुरवढा करता येत नव्हता. अशा परिस्थिती नरेंद्र फिरोदिया यांनी मी केलेल्या केवळ एका मेसेजवर नव्या अफेरेसीस मशीन साठी मंजुरी देत हे मशीन उपलब्ध केले आहे. या संकट काळात सतत मदतीला धावून जाणारे नरेंद्र फिरोदिया हे मानव कल्याणाचे कार्य करत आदर्श योद्धा ठरत आहेत.

.विलास मढीकर यांनी कार्यक्रमाचे सुत्रसंचलन व आभार मानले. यावेळी जनकल्याण रक्तपेढीचे व्यवस्थापक मुकेश साठ्ये, सुशांत पारनेरकर, सोनाली खंदारे, सागर उंडे आदी उपस्थित होते.

No comments:

Post a Comment