श्रीगोंदा युवक काँग्रेसच्यावतीने कोविड सेंटरला मास्क व सॅनिटायझर वाटप - Nagari Davandi : Breaking & Latest Marathi News Live, Marathi News Updates

Breaking

Post Top Ad

Saturday, May 22, 2021

श्रीगोंदा युवक काँग्रेसच्यावतीने कोविड सेंटरला मास्क व सॅनिटायझर वाटप

 श्रीगोंदा युवक काँग्रेसच्यावतीने कोविड सेंटरला मास्क व सॅनिटायझर वाटप


नगरी दवंडी/प्रतिनिधी
श्रीगोंदा ः भारताचे माजी पंतप्रधान भारतरत्न स्वर्गीय राजीवजी गांधी यांच्या पुण्यतिथीनिमित्त महाराष्ट्र प्रदेश युवक काँग्रेसचे महासचिव प्रशांत ओगले यांनी श्रीगोंदा युवक काँग्रेसच्यावतीने श्रीगोंदा शहरातील रत्न-कमल मंगल कार्यालयात सुरू असलेले संत शेख महंमद महाराज कोविड सेंटर तसेच चांडगाव येथील कोविड सेंटरमध्ये भेट देऊन मास्क व सॅनिटायझर देण्यात आले. तसेच शेतीमध्ये काम करणार्‍या मजुरांना बिस्किट वाटण्यात आले.
यावेळी महाराष्ट्र प्रदेश युवक काँग्रेसचे महासचिव प्रशांत ओगले तसेच प्रोफेशनल काँग्रेसचे तालुकाध्यक्ष प्रशांत सीदनकर संदीप वागस्कर राहुल शिंदे अजित भोसले उपस्थित होते.

No comments:

Post a Comment