अत्यावश्यक सेवेतील कर्मचारी व विक्रेते यांचे तात्काळ लसीकरण करा ः आढाव - Nagari Davandi : Breaking & Latest Marathi News Live, Marathi News Updates

Breaking

Post Top Ad

Saturday, May 22, 2021

अत्यावश्यक सेवेतील कर्मचारी व विक्रेते यांचे तात्काळ लसीकरण करा ः आढाव

 अत्यावश्यक सेवेतील कर्मचारी व विक्रेते यांचे तात्काळ लसीकरण करा ः आढाव


नगरी दवंडी/प्रतिनिधी
राहुरी ः पत्रकार, शिक्षक,औषधविक्रेत्यांसह अत्यावश्यक सेवेतील कर्मचारी व विक्रेते यांचे तात्काळ लसीकरण करण्याची मागणी पंचायत समितीचे गट नेते माजी उपसभापती  रवींद्र आढाव यांनी केली.
राहुरी तालुक्यातील पत्रकार, शिक्षक,औषधविक्रेत्यांसह  अत्यावश्यक सेवेतील कर्मचारी व विक्रेते यांचे तात्काळ लसीकरण करावे अशी आग्रही  मागणी राष्ट्रवादी काँग्रेसचे जिल्हा सरचिटणीस,सुरेश अप्पा निमसे,राहुरी पंचायत समितीचे उपसभापती प्रदीप पवार,माजी उपसभापती बाळासाहेब लटके,माजी उपसभापती व गटनेते रवींद्र आढाव यांनी  प्रांताधिकारी डॉ दयानंद जगताप व तहसीलदार शेख यांच्याकडे केली आहे.
प्रांताधिकारी डॉ दयानंद जगताप व  तहसीलदार शेख यांना दिलेल्या निवेदनात म्हटले आहे की, राहुरी शहरासह  तालुक्यात माजी खासदार प्रसाद तनपुरे व नामदार प्राजक्तदादा  तनपुरे यांच्या मार्गदर्शनाखाली लसीकरण नियोजनपूर्वक सुरू आहे. सदर लसीकरणात आरोग्य कर्मचार्‍यांबरोबर खांद्याला खांदा लावून काम करणारे प्राथमिक व माध्यमिक शिक्षक यांचे लसीकरण करावे.पत्रकारांना वृत्ताकंना साठी  कोविड सेंटर, विविध कार्यालयांबरोबरच सर्वत्र जावे लागते त्यामुळे प्राधान्याने पत्रकार बांधवांचे लसीकरण करण्यात यावे.त्याबरोबरच अत्यावश्यक सेवेचा अविभाज्य भाग असलेले वृत्तपत्र विक्रेते,औषध विक्रेते,किराणा दुकानदार,दुधसंकलन चालक व त्यांचे कर्मचारी,बँक व पतसंस्था यांचे कर्मचारी,कृषी सेवा केंद्र चालक,सफाई कर्मचारी सर्वांचा फ्रंटलाईन वर्कर म्हणून समावेश करून वरील सर्वांचे प्राधान्याने लसीकरण करावे अशी मागणी करण्यात आली.या वेळी तहसीलदार शेख व प्रांताधिकारी डॉ दयानंद जगताप यांचेशी सविस्तर चर्चा करण्यात येऊन त्यांनी सकारात्मक निर्णय घेण्याचे आश्वासन दिले.

No comments:

Post a Comment