कोपरगाव तालुक्यातील करंजी गावात निराधार कुटुंबाला प्रहार चा आधार - Nagari Davandi : Breaking & Latest Marathi News Live, Marathi News Updates

Breaking

Post Top Ad

Responsive Ads Here

Friday, May 21, 2021

कोपरगाव तालुक्यातील करंजी गावात निराधार कुटुंबाला प्रहार चा आधार

 कोपरगाव तालुक्यातील करंजी गावात निराधार कुटुंबाला प्रहार चा आधार

शिर्डी ः राज्यात कोरोना महामारीचे प्रचंड मोठे संकट उभे असताना अशातच कोपरगाव तालुक्यातील करंजी गावात एक हृदयद्रावक घटना घडली. श्री भिमा गायकवाड यांच्या हातावर पोट असणार्‍या आदिवासी कुटुंबामध्ये जळीत झाले. कोपीच्या घरात होतं नव्हते ते सारे जळून खाक झाले. ही घटना राज्यमंत्री बच्चू कडू यांना समजताच त्यांनी कोपरगाव तालुक्यातील प्रहार जनशक्ती पक्षाचे अहमदनगर उत्तर चे कार्याध्यक्ष श्री संजय शिंदे तालुकाध्यक्ष संदीप क्षीरसागर यांना पुढील मदतीचे आदेश दिले. संदीप शिंदे यांनी तात्काळ दखल घेत दुष्काळात तेरावा महिना आलेल्या श्री गायकवाड कुटुंबाना आज त्वरित एक महिना पुरेल इतका किराणा देत या कुटुंबाचे सांत्वन केले, तसेच आज अपंग क्रांती जिल्हा संघटक परमेश्वर कराळे प्रहार जनशक्ती पक्षाचे जिल्हा संघटक श्री.अभिजित कालेकर, जिल्हा सरचिटणीस अभिजित पाचोरे, कोपरगाव शहर अध्यक्ष दीपक पठारे, अपंग शहर अध्यक्ष प्रवीण भुजाडे, तालुकाध्यक्ष शरद खिलारी, प्रमोद आरोटे, संदीप शहाने, कृष्णा भिंगारे या कोपरगाव तालुक्यातील प्रहार पदाधिकार्‍यांनी प्रत्यक्ष कुटुंबियांना भेट देऊन सांत्वन केले तसेच या कुटुंबाला मदतीचा आधार म्हणून लहान बालके तसेच कुटुंबातील इतर सर्व सदस्यांना नवीन कपडे दिले, महिलांना साडी चोळी दिली.

No comments:

Post a Comment

Post Bottom Ad

Responsive Ads Here