मशिदीच्या ट्रस्टींवर खोटा गुन्हा दाखल केल्याचा आरोप - Nagari Davandi : Breaking & Latest Marathi News Live, Marathi News Updates

Breaking

Post Top Ad

Responsive Ads Here

Friday, May 21, 2021

मशिदीच्या ट्रस्टींवर खोटा गुन्हा दाखल केल्याचा आरोप

 मशिदीच्या ट्रस्टींवर खोटा गुन्हा दाखल केल्याचा आरोप

पोलीस अधीक्षक कार्यालय येथे निवेदन देऊन चौकशी करण्याची ट्रस्टीची मागणी


नगरी दवंडी/प्रतिनिधी
अहमदनगर ः अहमदनगर शहरातील पिंजार गल्ली येथील रिठा मशिद येथे भाडेकरी इमरान शेख व मोहम्मद शेख या दोघा भाडेकरूं व मशिद चया ट्रस्टी यांचा कोर्टामध्ये दावा दाखल असून तो दावा काढून घेण्यासाठी बेकायदेशीर मार्गाने  खोटे गुन्हे दाखल करून तसेच गुंड युसुफ ठोकला यांच्यामार्फत जीवे मारण्याची धमकी दिल्याच्या निषेधार्थ पोलीस अधीक्षक कार्यालय येथे सदर मागणीचे निवेदन रिठा मज्जित ट्रस्टचे ट्रस्टी  च्या वतीने निवेदन देण्यात आले यावेळी ट्रस्टी फय्याज फकीर मोहम्मद, गफूर पिंजारी, फिरोज पिंजारी, जब्बार शेख, जाफर पिंजारी, सलीम पिंजारी आदी उपस्थित होते.                                            
निवेदनामध्ये मशिदचे ट्रस्टी म्हणाले की भाडेकरू इमरान सादिक शेख व मोहम्मद इस्माईल शेख हे दोघेही रीठा मज्जित पिंजार गल्ली या ट्रस्टचे मिळकतीत भाडेकरी असून त्यापैकी इमरान सादिक शेख यांच्याविरुद्ध अहमदनगर येथील दिवाणी न्यायालयात दिवाणी दाखल आहेत न्यायालयाने सदर भाडेकरी यास सन 2008 पासून 5 हजार रुपये दरमहा प्रमाणे भाडे देण्याचा आदेश केलेला आहे. सदर भाडे करून वर 13 वर्षा पासून भाडे थकीत असून नऊ लाख 50 हजार रुपये कोर्टाने ठरवल्याप्रमाणे येणे बाकी आहे.  सदर मशिदीचे ट्रस्टी म्हणून आम्ही भाडेकरू कडे थकीत भाडे रक्कम वसुली करिता मागणी केली असता त्याचा राग येऊन सदर भाडेकरूंनी वेळोवेळी मशिदीचे ट्रस्टींना व प्रार्थना करणार्‍या येणार्‍या भाविकांना शिवीगाळ व मारहाण केलेली आहे तसेच मशिदीचे सांडपाणी जात असलेल्या गटारी वर अतिक्रमण करून सदरची गटार जाणीवपूर्वक बंद केल्यामुळे मशिदीचे ट्रस्टींनी सदरील व्यक्तीविरुद्ध अहमदनगर महानगरपालिका व जिल्हाधिकारी यांच्याकडे भाडेकरू विरुद्ध योग्य ती कायदेशीर कारवाई करण्यासाठी निवेदन दिले होते भाडे बाकी रक्कम वसुलीचे व अहमदनगर महानगरपालिके मध्ये त्यांनी केलेल्या अतिक्रमण विरुद्ध अर्जाचा राग येऊन सदर भाडेकरू यांनी मशिदीचे ट्रस्टी विरुद्ध कोतवाली पोलिस स्टेशन येथे खोटे गुन्हे दाखल केले आहे तसेच ट्रस्टींना झेंडीगेट येथील सराईत गुंड युसुफ ठोकला यांच्यामार्फत सदर भाडेकरी विरुद्धची न्यायालयीन तक्रार काढून घ्या अन्यथा पुन्हा खोट्या गुन्ह्यांमध्ये अडकवण्याची तसेच वेळप्रसंगी हातपाय तोडून जीवे मारण्याची धमकी दिलेली आहे सदर व्यक्तींच्या गुंडगिरी मुळे परिसराचे व शहराची सामाजिक शांततेला व सुरक्षिततेला खूप मोठा धोका निर्माण होण्याची शक्यता आहे त्यामुळे भाडेकरू विरुद्ध कडक स्वरूपाची कायदेशीर कारवाई करण्यात यावी अशा मागणीचे निवेदन रिटा मशिद ट्रस्टतर्फे देण्यात आले आहे.

No comments:

Post a Comment

Post Bottom Ad

Responsive Ads Here