बाभळेश्वरसह तिसगावात ज्येष्ठांचे लसीकरण सुरु : धनश्री विखेंच्या हस्ते शुभारंभ - Nagari Davandi : Breaking & Latest Marathi News Live, Marathi News Updates

Breaking

Post Top Ad

Friday, May 21, 2021

बाभळेश्वरसह तिसगावात ज्येष्ठांचे लसीकरण सुरु : धनश्री विखेंच्या हस्ते शुभारंभ

 बाभळेश्वरसह तिसगावात ज्येष्ठांचे लसीकरण सुरु : धनश्री विखेंच्या हस्ते शुभारंभ


शिर्डी ः
शिर्डी मतदार संघातील लसीकरण मोहीमेत बाभळेश्वर येथील प्राथमिक आरोग्य उपकेंद्रात बाभळेश्वर व तीसगाव येथील 45 ते 60 वर्ष वयोगटातील नागरिकांच्या कोविड लसीकरणाचा शुभारंभ रणरगिणी महिला मंडळाच्या अध्यक्षा सौ. धनश्रीताई विखे पाटील यांच्या हस्ते पार पडला. त्यावेळी सरपंच सौ.विमलताई म्हस्के, उपसरपंच अमृत मोकाशी, प.स. माजी उपसभापती बबलू म्हस्के, विखे पाटील कारखान्याचे माजी संचालक आण्णासाहेब बेंद्रे, ग्रामपंचायत सदस्य अजित बेंद्रे, दादासाहेब बेंद्रे, राहुल डहाळे, कोल्हार प्राथमिक आरोग्य केंद्राचे वैद्यकिय अधिकारी डॉ. संजय घोलप, डॉ. सातपुते, ग्रामविकास अधिकारी कराळे, तलाठी भाग्यश्री शिंदे, व ग्रामस्त उपस्थित होते. तसेच लसीकरणासाठी आलेल्या नागरिकांशी धनश्रीताई विखे पाटील यांनी संवाद साधला तसेच त्यांच्यासह त्यांच्या कुटुंबीयांनी देखील लसीकरण करुन घ्यावे असे आवाहन केले.

No comments:

Post a Comment