जनकल्याण समितीच्यावतीने रक्तदान शिबिराचे आयोजन - Nagari Davandi : Breaking & Latest Marathi News Live, Marathi News Updates

Breaking

Post Top Ad

Responsive Ads Here

Monday, May 24, 2021

जनकल्याण समितीच्यावतीने रक्तदान शिबिराचे आयोजन

 जनकल्याण समितीच्यावतीने रक्तदान शिबिराचे आयोजन


नगरी दवंडी/प्रतिनिधी
राहुरी ः
राहुरी येथे जनकल्याण समितीच्या वतीने रविवारी दि 23 मे रोजी रक्तदान शिबिराचे आयोजन करण्यात आले होते . शहरालगत पांडुरंग लॉन्स येथे आयोजित केलेल्या या रक्तदान शिबिराला युवक वर्गाचा चांगला प्रतिसाद मिळाला. या शिबिराचे उद्घाटन नगराध्यक्ष अनिल कासार यांनी केले . यावेळी नगरसेवक अशोक आहेर, समितीचे जिल्हा कार्यकर्ते वैभव धुमाळ , राजेंद्र भुजाडी , जनकल्याण रक्तपेढी अहमदनगर चे डॉक्टर विलास मढिकर ,राहुल भिंगारकर उपस्थित होते . नियम पालन करून रक्तदान करण्यात आले . महिला वर्गाने हि या शिबिरास प्रतिसाद दिला . समितीच्या वतीने या शिबिरात 114 जणांनी केल्याची माहिती देण्यात आली. रक्तदान शिबिराला चांगला प्रतिसाद मिळाला.


No comments:

Post a Comment

Post Bottom Ad

Responsive Ads Here