राजमाता पुण्यश्लोक अहिल्यादेवी होळकर यांची जयंती घराघरात साजरी करा ः माने - Nagari Davandi : Breaking & Latest Marathi News Live, Marathi News Updates

Breaking

Post Top Ad

Responsive Ads Here

Monday, May 24, 2021

राजमाता पुण्यश्लोक अहिल्यादेवी होळकर यांची जयंती घराघरात साजरी करा ः माने

 राजमाता पुण्यश्लोक अहिल्यादेवी होळकर यांची जयंती घराघरात साजरी करा ः माने


नगरी दवंडी/प्रतिनिधी

जामखेड ः  राजमाता पुण्यश्लोक अहिल्यादेवी होळकर म्हणजे संपूर्ण हिंदुस्थानचे प्रेरणास्थान आहेत. कुशल प्रशासक व आदर्श न्याय पद्धतीच्या जोरावर त्यांनी रयतेच्या जगण्याचा खर्‍या अर्थाने राम आणला. जवा हिंदुस्तान परकिय राजवटीमुळे शंत खंडित झाला होता. त्यास अखंडित ठेवण्याचा काम पुण्यश्लोक अहिल्यादेवी होळकर यांनी केले. या खंडप्राय देशाच्या प्रत्येक भौगोलिक स्थानावर त्यांनी अनेक मंदिरांची निर्मिती केली व शेकडो मंदिरे जनार्धन  जीनौद्रधार केला व हिंदू संस्कृतीला पुनर्जीवित करत भारत भूमीला आत्मसन्मान मिळवून दिला.

सध्या देशात आणि महाराष्ट्रात कोरोना व्हायरस माहामारी असल्या मुळे महाराष्ट्रातील सर्व समाज बांधवांनी राजमाता पुण्यश्लोक अहिल्यादेवी होळकर यांची जयंती घरा घरात साजरी करूया अशा या महान प्रेरणादायी पुण्यश्लोक अहिल्यादेवी होळकर यांचे माहेर जन्मस्थान अहमदनगर जिल्ह्यातील जामखेड ता. चौंडी हे आहे.महाराष्ट्रात जन्माला येणार्‍या पुण्यश्लोक अहिल्यादेवी होळकर यांची चौंडी येथे जयंती दर वर्षी मोठया उत्साहात होती परंतू कोरोना व्हायरस मुळे या वर्षी  साध्य पध्दतीने साजरी होणार आहे.असे राजमाता पुण्यश्लोक अहिल्यादेवी होळकर यांचे माहेर कडील वंशज माजी मंत्री प्रा.राम शिंदे साहेब यांनी जाहीर केले आहे. राजमाता पुण्यश्लोक अहिल्यादेवी होळकर यांनी संपूर्ण हिंदुस्थानला नवी दिशा दिली. देशाला अखंडित ठेवले. त्यांच्या महान स्मृती पुढे नतमस्तक होऊन पुण्यश्लोक अहिल्यादेवी होळकर यांची जयंती घरा घरात साजरी करूया एवढी विनंती.

No comments:

Post a Comment

Post Bottom Ad

Responsive Ads Here