निळवंडे धरणाच्या कालव्याच्या कामाला गती - Nagari Davandi : Breaking & Latest Marathi News Live, Marathi News Updates

Breaking

Post Top Ad

Responsive Ads Here

Monday, May 24, 2021

निळवंडे धरणाच्या कालव्याच्या कामाला गती

 निळवंडे धरणाच्या कालव्याच्या कामाला गती

नगरी दवंडी/प्रतिनिधी
राहुरी ः निळवंडे धरणाच्या कालव्या च्या कामाला आपण गती दिली आहे .या कामाला एकही रुपया कमी पडू देणार नाही. यावर्षी 500 कोटी रुपये खर्च होतील असे आपण अर्थसंकल्पात तरतूद केलेली आहे .डिसेंबर 2022 पर्यंत कालव्याची कामे पूर्ण होवून त्या कालव्यामधून पाणी येऊन थेट शेतकर्‍यांच्या शेतापर्यंत पोहोचेल आणि हा परिसर सुजलाम सुफलाम होईल असे प्रतिपादन जलसंपदामंत्री जयंत पाटील यांनी केले.
निळवंडे धरणाच्या कालव्याची पाहणी करण्यासाठी मंत्री जयंत पाटील यांनी कानडगाव शिवारातील कालव्याची पाहणी नामदार पाटील यांनी केली .कामाला गती येण्यासाठी अधिकार्‍यांना देखील वेगवेगळ्या सूचना त्यांनी केल्या .याप्रसंगी नगरविकास राज्यमंत्री प्राजक्त तनपुरे ,माजी खासदार प्रसाद तनपुरे ,पाटबंधारे विभागाचे अधिकारी व लाभधारक शेतकरी उपस्थित होते .
भागडा चारी देखभाल दुरुस्तीसाठी एक कोटी 50 लाख रुपये देण्याची मागणी करण्यात आली असता हा प्रस्ताव औरंगाबाद येथील गोदावरी खोरे विकास महामंडळात प्रलंबित असून संबंधित अधिकार्‍यांना नामदार जयंत पाटील यांनी प्रस्ताव लवकरात लवकर मंत्रालयात पाठवा. तातडीने निधी मंजूर करून देण्यात येईल असे सांगितले .यावेळी जि प मा अध्यक्ष बाबासाहेब भिटे , जिल्हा राष्ट्रवादी युवा काँग्रेस अध्यक्ष कपिल पवार, राष्ट्रवादी शहर अध्यक्ष संतोष आघाव, अमोल जाधव आदी उपस्थित होते.

No comments:

Post a Comment

Post Bottom Ad

Responsive Ads Here