वृद्ध आईला सांभाळत नाही म्हणून राहुरी खुर्द येथे गुन्हा दाखल - Nagari Davandi : Breaking & Latest Marathi News Live, Marathi News Updates

Breaking

Post Top Ad

Responsive Ads Here

Monday, May 31, 2021

वृद्ध आईला सांभाळत नाही म्हणून राहुरी खुर्द येथे गुन्हा दाखल

 वृद्ध आईला सांभाळत नाही म्हणून राहुरी खुर्द येथे गुन्हा दाखल

राहुरी - वृद्ध आईला सांभाळत नाही आणि घरातून तिला हाकलून दिले म्हणून राहुरी खुर्द येथील मुलाविरोधात राहुरी पोलिसांनी ज्येष्ठ नागरिक आणि पालक यांचे पालन पोषण आणि कल्याण कायद्याअंतर्गत गुन्हा दाखल केला आहे. या कायद्याअंतर्गत राहुरी तालुक्यामध्ये हा प्रथमच गुन्हा दाखल झाला आहे.
राहुरी खुर्द येथे राहणार्‍या अनुसया सिताराम डोळस या वृद्ध महिलेस तिचा मुलगा संदीप सिताराम डोळस हा सांभाळत नाही व त्याने तिला घरातुन हाकलून दिल्याने तिला राहण्यास घर नाही.तिच्यावर उपासमारीची वेळ आल्यावर सदर वृद्धेचा मुलगा संदीप सिताराम डोळस याच्या विरोधात राहुरी पोलिसांमध्ये गुन्हा रजिस्टर क्रमांक 427 / 2021 ज्येष्ठ नागरिक आणि पालक यांचे पालन - पोषण आणि कल्याण अधिनियम 2007 चे कलम 24 प्रमाणे गुन्हा नोंदवला आहे. याबाबत वृद्ध महिला अनुसया सिताराम डोळस यांनी राहुरी पोलिसांमध्ये रितसर फिर्याद दिली आहे.
याबाबत पोलीस निरीक्षक नंदकुमार दुधाळ यांनी आवाहन करताना सांगितले, 60 किंवा त्यापेक्षा जास्त वय असलेल्या ज्येष्ठ नागरिकास या कायद्याअंतर्गत पालन पोषणाची जबाबदारी असलेली मुले पालक अशा व्यक्तींनी कायमस्वरूपी अथवा तात्पुरते सोडून देण्याच्या उद्देशाने कृती केली असल्यास या कायद्याअंतर्गत असे करणार्‍या व्यक्तीस तीन महिने पर्यंत तुरुंगवास अथवा रुपये पाच हजारापर्यंत दंड अथवा दोन्ही शिक्षांची तरतूद करण्यात आली आहे . आपली मुले नातेवाईक अथवा पाल्य यांनी आपली काळजी घेण्यास निष्काळजीपणा दाखवल्यास अगर नकार दिल्यास आपली पालनपोषणाची जबाबदारी झुगारून आपणास घराबाहेर काढून दिल्यास आपण आपल्या कायदेशीर मुलाकडून चरितार्थासाठी निर्वाहभत्त्याची मागणी करू शकता. किंवा सदर पाल्या विरोधात पोलीस स्टेशनला सदर कलमान्वये गुन्हा दाखल करू शकता. त्यामुळे कोणत्याही ज्येष्ठ नागरिकांनी न घाबरता राहुरी पोलिसांकडे याबाबत रितसर तक्रार करावी. त्यांना नक्कीच न्याय मिळवून देण्यासाठी आणि प्रयत्नशील राहू.

No comments:

Post a Comment

Post Bottom Ad

Responsive Ads Here