इंद्रप्रस्थ मंगल कार्यालय येथे आ. संग्राम जगताप यांच्या नेतृत्वाखाली लसीकरण केंद्र सुरू - Nagari Davandi : Breaking & Latest Marathi News Live, Marathi News Updates

Breaking

Post Top Ad

Monday, May 31, 2021

इंद्रप्रस्थ मंगल कार्यालय येथे आ. संग्राम जगताप यांच्या नेतृत्वाखाली लसीकरण केंद्र सुरू

 इंद्रप्रस्थ मंगल कार्यालय येथे आ. संग्राम जगताप यांच्या नेतृत्वाखाली लसीकरण केंद्र सुरू

मंगल कार्यालयाच्या माध्यमातून लसीकरणामध्ये सुसूत्रता येईल- चेअरमन अनिल पोखरण


अहमदनगर ः
कोरोनासंसर्ग विषाणूंचा प्रादुर्भाव रोखण्यासाठी नागरिकांचे लवकरात-लवकर लसीकरण करणे गरजेचे आहे.आ. संग्राम जगताप यांच्या सूचनेनुसार संपूर्ण शहरभर मंगल कार्यालयांमध्ये लसीकरण केंद्रे सुरू झाले आहे त्यामुळे आरोग्य केंद्रांवर लसीकरणासाठी होणारी गर्दी आता आटोक्यात येणार आहे. त्यामुळे कोरोनाचा प्रादुर्भाव थांबण्यास मदत होईल मंगल कार्यालय मध्ये नागरिकांना आता बसण्यासाठी खुर्च्यांच्या व्यवस्थाही करण्यात आली आहे,नागरिकांचे होणारे हाल आता मंगल कार्यालय लसीकरण केंद्र उभे केल्यामुळे हाल होणार नाही. व टप्प्याने सर्व नागरिकांचे लसीकरण करण्यास प्रशासनास व आरोग्य विभागास मदत होईल असे प्रतिपादन मर्चंट बँकेचे चेअरमन अनिल पोखरणा यांनी केले. मार्केटयार्ड मधील इंद्रप्रस्थ मंगल कार्यालय मध्ये आ.संग्राम जगताप यांच्या मार्गदर्शनाखाली लसीकरणाचा शुभारंभ मर्चंट बँकेचे चेअरमन अनिल पोखरणा यांच्या हस्ते संपन्न यावेळी स्थायी समिती सभापती अविनाश घुले,ज्येष्ठ नगरसेवक गणेश भोसले, नगरसेवक प्रकाश भागानगरे,मर्चंट बँकेचे संचालक संजय चोपडा,बाजार समितीचे संचालक राजेंद्र बोथरा, संतोष सुर्यवंशी,छबुराव कांडेकर,शिवाजी विधाते,अमित मुथा, धनेश कोठारी,राजू शेटीया,बाप्पू ओहळ,प्रकाश इवळे,लकी खुपचंदानी, रामदास कानडे,महादेव कराळे,प्रकाश कराळे आदी उपस्थित होते.

No comments:

Post a Comment