कोरोनाला गाडूनच पुढे जावे लागेल ः हसन मुश्रीफ. - Nagari Davandi : Breaking & Latest Marathi News Live, Marathi News Updates

Breaking

Post Top Ad

Wednesday, May 26, 2021

कोरोनाला गाडूनच पुढे जावे लागेल ः हसन मुश्रीफ.

 कोरोनाला गाडूनच पुढे जावे लागेल ः हसन मुश्रीफ.

होम क्वारंटाईनमुळे अनेक कुटुंब उध्वस्त.. ः आता होम क्वारंटाईन ऐवजी संस्थापक विलगीकरण.

होम क्वारंटाईनमुळे एकाच कुटुंबियातील अनेक सदस्यांना बाधा होऊन कुटुंबाचे कुटुंब उद्ध्वस्त झाली आहेत. त्यामुळे शासनाने होम क्वारंटाईन बंद करण्याचा निर्णय घेतला असून 15 व्या वित्त आयोगाच्या माध्यमातून ग्रामपंचायत पातळीवर 30 बेडचे कोव्हिड सेंटर उभारण्याची शासनाने परवानगी दिली आहे.



नगरी दवंडी/प्रिंतनिधी
पारनेर ः पारनेर तालुक्यातील 21 गावातील ग्रामस्थांनी ‘कोरोना’ चा राक्षस वेशीवरच रोखला आहे. ग्रामस्थांबरोबर प्रशासकीय यंत्रणा दीड वर्षांपासून चांगले काम करीत आहे. ही यंत्रणा आता थकली असली तरी आता थकून जाऊ नका. कोरोनाला गाडूनच आपल्याला पुढे जावे लागणार आहे. राज्यात कोरोना रुग्ण संख्या झपाट्याने कमी होत असली तरी तिसर्‍या लाटे साठी सर्वांनाच सावधान राहावेच लागेल असे आवाहन नगर जिल्ह्याचे पालकमंत्री हसन मुश्रीफ यांनी आज भाळवणी येथील कोरोना आढावा बैठकीत केले आहे.
श्री. मुश्रीफ यांनी आज सकाळी शरदचंद्र पवार कोव्हिड सेंटरला भेट दिली याप्रसंगी ते बोलत होते. श्री. मुश्रीफ पुढे म्हणाले की, आमदार निलेश लंके यांनी सुरू केलेले शरच्चंद्र पवार कोव्हिड सेंटर जिल्ह्यातच नव्हे तर राज्यातही आदर्श ठरेल असे सेंटर आहे आ. लंके यांचे कौतुक करावे तेवढे थोडेच आहे राज्यातील कोरोना रुग्णांची संख्या कमी होत असली तरी काही जिल्हे अद्याप रेड झोन मध्ये आहेत. रेड झोन मधील जिल्ह्यामध्ये 31 मे नंतर कडक निर्बंध राहतील. ग्रीन झोन बाबत नियमावली तयार करण्याचे काम सुरू असून ती लवकर प्रसिद्ध करण्यात येईल असे सांगून मुश्रीफ पुढे म्हणाले. मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांनी तिसर्‍या लाटेला सामोरे जाण्याची तयारी सुरू केली आहे आता गाफील राहून चालणार नाही असेही ते म्हणाले.
यावेळी आमदार निलेश लंके, जिल्हाधिकारी डॉ.राजेंद्र भोसले, प्रांताधिकारी सुधाकर भोसले, जिल्हा परिषदेचे उपमुख्य कार्यकारी अधिकारी जगन्नाथ भोर,आरोग्य अधिकारी डॉ.संदिप सांगळे,उपविभागीय अधिकारी अजित पाटील, तहसिलदार ज्योती देवरे,पोलिस निरीक्षक घनश्याम बळप महावितरणचे अभियंता प्रशांत आडभाई, नगर पंचायतीच्या मुख्य कार्यकारी अधिकारी डॉ.सुनीता कु्मावत गटविकास अधिकारी किशोर माने ,आरोग्य अधिकारी डॉ.प्रकाश लाळगे, डॉ बाळासाहेब कावरे, डॉ.मानसी मानूरकर, डॉ. राजेंद्र लोंढे यांच्या कर्मचारी मोठ्या संख्येने उपस्थित होते. या आढावा बैठकीत प्रांताधिकारी सुधाकर भोसले व तहसीलदार ज्योती देवरे यांनी पारनेर तालुक्यातील कोरोना काळात राबविण्यात आलेल्या विविध उपाययोजना व इतर बाबींची माहिती आढावा बैठकीत देण्यात आली.

तिसरा लाटेचा धोका लहान मुलांना आहे त्यामुळे त्यादृष्टीने प्रशासकीय पातळीवर उपाययोजना करण्यात आल्या आहेत.परंतु आता कोरोना बरोबर म्युकर मायकोसिसचाही सामना आपल्याला करावा लागणार आहे. प्रशासकीय पातळीवर महसुल आरोग्य व पोलिस अधिकारी चांगले काम करत आहेत. त्यामुळे यापुढेही असेच सहकार्य राहु दया. पारनेर तालुक्यात माझ्या खांद्याला खांदा लावुन महसूल व पोलिस अधिकारी काम करत आहेत. - निलेश लंके, आमदार मतदार संघ पारनेर

No comments:

Post a Comment