विशाल कुलथे हत्याप्रकरणी दोषींवर कारवाईची मागणी - Nagari Davandi : Breaking & Latest Marathi News Live, Marathi News Updates

Breaking

Post Top Ad

Wednesday, May 26, 2021

विशाल कुलथे हत्याप्रकरणी दोषींवर कारवाईची मागणी

 विशाल कुलथे हत्याप्रकरणी दोषींवर कारवाईची मागणी

नगरी दवंडी/प्रतिनिधी
राहुरी ः
बीड जिल्ह्यातील सुवर्णकार कै.विशाल कुलथे हत्या प्रकरणी युवा सोनार संघटनेने अतिषय गांर्भियाने दखल घेवुन आज राहूरीत तहसिलदार एफ आर शेख व पोलिस निरीक्षक नंदकुमार दुधाळ यांना निवेदन दिले व दोषीवर कडक कारवाईची मागणी केली.
राहुरी तहसीलदार कार्यालयात व पोलीस ठाण्यात याबाबत निवेदन देण्यात आले .या प्रसंगी युवा सोनार संघटनेचे राहुरी तालुका अध्यक्ष महेश शहाणे , उपाध्यक्ष मनोज आंबिलवादे , शहर अध्यक्ष राजेंद्र मुंडलिक ,शहर सचिव ऋषिकेश डहाळे , युवा सोनार संघटनेचे तालूका कार्यध्यक्ष विलास माळवे , शहर उपाध्यक्ष रोहीत डहाळे , शहर कार्याध्यक्ष प्रसाद कुलथे , तालुका सचिव सागर मुंडलिक ,शहर सचिव कृष्णा उदावंत , सहसचिव प्रशांत कुलथे , शहर सहसचिव शुभम शेवंते , ग्राम अध्यक्ष चंद्रशेखर बागडे , उपाध्यक्ष दीपक उदावंत आदी उपस्थित होते.

No comments:

Post a Comment