दोन गटात राडा! - Nagari Davandi : Breaking & Latest Marathi News Live, Marathi News Updates

Breaking

Post Top Ad

Responsive Ads Here

Wednesday, May 26, 2021

दोन गटात राडा!

 दोन गटात राडा!

तलवारींचा वापर. आठ जण गंभीर जखमी.


पाथर्डी -
पाथर्डी शहरातील अजंठा चौकात काल रात्री शिरसवाडी व भिकनवाडा या दोन्ही गटात तूफाणी राडा झाला. तुंबळ हाणामारीत एक-मेकांच्या वर तलवारीने वार करण्यात आले. दोन्ही गटांकडून परस्परविरोधी जीवे मारण्याचा प्रयत्न केले बाबत विविध कलमान्वये गुन्हे दाखल झाले आहेत. जमावाने केलेल्या दगडफेकीत वीस ते पंचवीस दुचाकीचे मोठे नुकसान झाले असून दगडफेकीमुळे रस्त्यावर दगडांचा खच पडला अचानक झालेल्या धुमचक्रीने नागरिकांची पळापळ झाली. घटना ठिकाणी अतिरिक्त पोलीस अधीक्षक सौरभ अग्रवाल,पोलीस उपविभागीय अधिकारी सुदर्शन मुंडे यांनी भेटी दिल्या.
या शहरातील अजंठा चौकात मंगळवारी सायंकाळी आठ वाजण्याच्या सुमारास दोन गटात तलवारीने आपसातील तुंबळ हाणामारीत शिरसाठवाडी व भिकनवाडा अशा दोन्ही गटातील 8 जन गंभीर जखमी झाले असून परस्पर विरोधी जीवे ठार मारण्याचा प्रयत्न केले बाबत विविध कलमान्वये गुन्हे दाखल झाले आहेत. सदरील घटने बाबत पहिल्या फिर्यादीत फिर्यादी गणेश बाळासाहेब शिरसाठ याने त्यांना व यांच्या सोबत असलेले महादेव बाळासाहेब शिरसाट,नितीन नवनाथ शिरसाट,नवनाथ यशवंत शिरसाठ रा.शिरसाठवाडी हे अजंठा चौकात दुध विक्री करत असताना भिकनवाडा येथील आरोपी 1) मुन्ना निजाम पठाण याच्या गाडीचा धक्का लागून दुध सांडल्याचा जाब विचारल्याचा राग येवून आरोपी 2)फारुख रफीक शेख 3)लाला रफीक शेख, 4)निजाम रफीक शेख 5)जुबेर फारूख शेख, 6)छोट्या राजू पठाण 7)जुबेर शफीक आतार 8)मुन्ना शेख (मटनवाला) 9)भैय्या शेख 10)काल्या निजाम शेख 11)रंगनाथ गायकवाड 12)सोहेल पठाण 13)बब्बू रिक्षावाला 14)सुरज दहीवाले 15)असिफ शेख व इतर 10 ते 12 आरोपींनी फिर्यादी व त्यांचे सहकार्यांना तलवार,चाकू,लोखंडी गज,लाठ्या काठ्याने जबर मारहाण करून जीवे ठार मारण्याचा प्रयत्न केला व रस्त्यावर उभ्या असलेल्या दुचाकीचे मोठे नुकसान केले बाबत पोलिसात फिर्याद दाखल केली आहे.
दुसर्‍या फिर्यादीत फिर्यादी अमीर उर्फ मुन्ना निजाम शेख हा त्याचे मालकीच्या गाडीचा धक्का लागल्याच्या रागातून याचे डोक्यात लोखंडी गजाने आरोपी 1) गोकुळ शिरसाठ 2) देवा शिरसाठ 3) प्रवीण शिरसाठ 4) गणेश शिरसाठ 5) नितीन शिरसाठ 6) संजय शिरसाठ यांच्यासह 10 ते 12 जणांनी फिर्यादी व त्यांचे सहकारी तौफिक शेख,रंगनाथ गायकवाड,जुबेर शेख यांना तलवार,लोखंडी गज,लाठ्या काठ्याने जबर मारहाण करून जीवे ठार मारण्याचा प्रयत्न केले बाबत पोलिसात फिर्याद दाखल केली आहे.

No comments:

Post a Comment

Post Bottom Ad

Responsive Ads Here