कुकडीच्या पाण्यासाठी मशाल पेटली..... - Nagari Davandi : Breaking & Latest Marathi News Live, Marathi News Updates

Breaking

Post Top Ad

Thursday, May 20, 2021

कुकडीच्या पाण्यासाठी मशाल पेटली.....

 कुकडीच्या पाण्यासाठी मशाल पेटली.....

शेतकर्‍यांच्या एकजुटीची वज्रमुठ, न्यायालयीन लढाईसाठी सज्ज..


नगरी दवंडी/प्रतिनिधी
पारनेर ः जवळा ता. पारनेर येथील महादेव  मंदिरात कुकडीच्या हक्काच्या पाण्यासाठी न्यायालयीन लढा देण्याचा निर्णय घेवून त्यासाठी  एकजूटीची शपत घेवून शेतकर्‍यांनी मशाल  पेटवली. कुकडी पाटबंधारे प्रकल्पाचे पाणी वाटपात डाव्या कालव्यावरील लाभक्षेत्रातील शेतकर्‍यांवर गेल्या पंचवीस वर्षांपासून  सातत्याने अन्याय होत आहे. या प्रकल्पातील धरणग्रस्तांचे पुर्नवसन पारनेर  आणि श्रीगोंदा तालुक्यातच झाले आहे.  डावा कालवा पावणे दोनशे किलोमीटर लांबीचा आहे व प्रकल्पाचे  लाभक्षेत्र जवळपास सत्तर टक्के आहे. दरवर्षी पाणी मात्र  तीस टक्केच मिळते. त्यामुळे येथील पिण्याचा व शेतीचा पाणीप्रश्न सतत निर्माण होत आहे. दरवर्षी पिके जळत आहेत. पुणे जिल्ह्याला कमी लाभक्षेत्र असूनही या प्रकल्पातुन बेकायदेशीरपणे  व बेसुमार पाणी वापर होतो. डाव्या कालव्यातील  शेतकरी मात्र दर वर्षी पाण्याविना  पिके सोडून देतात. पाण्याचे शाश्वत वाटप निश्चित नसल्यामुळे पिकांचे नियोजन करता येत नाही. म्हणून जलसंपत्ती प्राधिकरण व न्यायालय यांच्याकडून लाभक्षेत्रानुसार समान पाणीवाटप निश्चित करून  घेण्याचे ठरले.
त्यासाठी  जवळा येथील बैठकीत कुकडी पाणी  संघर्ष समिती स्थापण करण्यात आली. तसेच या संघर्ष समितीमधे श्रीगोंदा, कर्जत, जामखेड, करमाळा येथील लाभक्षेत्रातील सर्वांना सामावून घेण्याचा ठराव घेण्यात आला. लवकरच या लाभक्षेत्र परिसरात  शेतकर्‍यांच्या बैठका घेण्याचे नियोजन ठरले.
हा न्यायालयीन लढा उभारूनच  आपल्याला न्याय मिळेल यावर मात्र  सर्वांनी  आपले एकमत नोंदवले. हा लढा बिगर राजकीय असेल व या आंदोलनाला राजकीय लोकांकडून  कोणताही मदतनिधी न घेण्याचा ठरावही घेतला आहे.
यासाठी एका समितीची स्थापना करण्यात आली आहे. या समितीला  न्यायालयीन लढाईसाठी लागणारे सर्व निर्णय घेण्याचे अधिकार  देण्यात आले. आंदोलनाला लागणार्‍या निधी संकलनासाठी  लवकरच   एक बॅक खाते कार्यरत  करून ते  सार्वजनिक केले जाईल,  शेतकर्‍यांनी आपली यथाशक्ती मदत  केवळ ऑनलाईन पध्दतीने निधी म्हणून जमा करण्याचे ठरले.
यावेळी सर्वांनी आपली विविध  मते व्यक्त केली. बैठकीला पारनेर तालुक्यातील   गणेश शेळके,ठकाराम लंके, सुभाष आढाव, राहुल शिंदे, संदिप सालके, गोरख पठारे, पंकज कारखिले, साहेबराव पानगे, कारभारी कोठावळे, पंढारीनाथ कवाष्ठे, मोहन आढाव, मंगेश सालके,  विश्वनाथ कोरडे, सुरेश पठारे, प्रसाद शितोळे,लाभेष औटी, संतोष खोडदे, मंगेश वराळ, नवनाथ सालके, कैलास आढाव, जयशिंग सालके, शंकर पठारे, कुंडलीक पठारे, रामदास घावटे, बबन कवाद, कैलास शेळके, बबन सालके, आबा खोडदे, गणेश देशमुख, संपत सालके, सतिष रासकर, अरूण सालके , पुंडलिक शेवकर, संतोष सालके, श्रीधर पठारे, विशाल गायकवाड, मंगेश कार्ले आदी शेतकरी उपस्थित होते.

No comments:

Post a Comment