श्रीगोंद्यातील कोविड सेंटरला 300 बॉक्स पाण्याची भेट - Nagari Davandi : Breaking & Latest Marathi News Live, Marathi News Updates

Breaking

Post Top Ad

Thursday, May 20, 2021

श्रीगोंद्यातील कोविड सेंटरला 300 बॉक्स पाण्याची भेट

 श्रीगोंद्यातील कोविड सेंटरला 300 बॉक्स पाण्याची भेट

श्रीगोंद्याच्या नगराध्यक्ष दाम्पत्याचा सामाजिक उपक्रम

वाढदिवसानिमित्त लोक मदत करतात पण लग्नाच्या वाढदिवसानिमित्ताने सामाजिक बांधिलकी रुग्णाप्रति जपल्याने पोटे दाम्पत्यांचे नागरिक आणि कोविड सेंटर मधून कौतुक केले जात आहे



नगरी दवंडी/प्रतिनिधी
श्रीगोंदा ः कोविड सेंटर मधील पिण्याच्या पाण्याची अडचण पाहता श्रीगोंदा शहराचे माजी नगराध्यक्ष मनोहर पोटे आणि विद्यमान नगराध्यक्षा सौ.शुभांगीताई पोटे या दांपत्याने आपल्या लग्नाच्या वाढदिवसाचे औचित्य साधून विविध कोविड सेंटरला 30हजार रुपयांचे 300 पाणी बॉटल बॉक्स भेट देऊन रुग्ण सेवा करत वाढदिवस साजरा केला.
मंगळवारी 18 मे रोजी लग्नाचा वाढदिवस होता कोविड काळात वाढदिवस करण्याऐवजी पाण्याचे बॉक्स देण्याचा उभयतांनी निर्णय घेतला शहरातील श्री संत शेख महमंद महाराज (रत्नकमल मंगलकार्यालय)कोविड सेंटरला 75बॉक्स, डॉ.बाबासाहेब आंबेडकर मुलींचे वसतिगृह येथील शासकीय कोविड सेंटरला 100 बॉक्स, छत्रपती शिवाजी महाविद्यालयातील कोविड सेंटरला 75 बॉक्स तर ग्रामीण रूग्णालयात 50 बॉक्स भेट देण्यात आले. यावेळी नगरसेवक सतीश मखरे,निसार बेपारी,समीर बोरा,वैद्यकीय अधिकारी डॉ.संघर्ष राजुळे, व्यापारी असोसिएशनचे अध्यक्ष सतीश शेठ बोरा, गौरव बोरा, प्रा. बाळासाहेब बळे,आदी उपस्थित होते.

No comments:

Post a Comment