शिर्डीतील पालखी रोडचे काम तातडीने पूर्ण करावे - Nagari Davandi : Breaking & Latest Marathi News Live, Marathi News Updates

Breaking

Post Top Ad

Thursday, May 20, 2021

शिर्डीतील पालखी रोडचे काम तातडीने पूर्ण करावे

 शिर्डीतील पालखी रोडचे काम तातडीने पूर्ण करावे



नगरी दवंडी

शिर्डी प्रतिनिधी -

भाजपचे नेते आ. राधाकृष्ण विखे पाटील आणि खा. डॉ. सुजय विखे पाटील यांच्या मार्गदर्शनाखालील शिर्डी नगरपंचायत हद्दीतील विविध रस्त्यांची कामे दर्जेदार आणि उत्कृष्टरित्या पूर्ण झाली असून त्यामुळे शहराच्या सौंदर्यात भर पडली आहे आणि नागरिकांची सुद्धा सोय झाली आहे. परंतु काही ठिकाणी दुर्लक्ष देखील झाले असून शहरातील मुख्य रस्ता असलेला - पालखी रोड दुर्लक्षित राहिल्याने ते तातडीने पूर्ण करण्यात यावे अशी मागणी शिर्डी शहर भाजपच्यावतीने मुख्याधिकारी काकासाहेब डोईफोडे यांना निवेदनाद्वारे केली आहे. शिर्डी शहर भाजपचे शहराध्यक्ष सचिन शिंदे यांनी दिलेल्या निवेदनात म्हटले आहे की, सन २००४ मध्ये विकसित करण्यात आल्यानंतर या रस्त्याची एकदाही डागडुजी करण्यात आली नाही. शेजारीच असणारा कोते गल्लीतील रस्ता या काळात दोनदा बनविला गेला ला आहे. आज पालखी रस्त्याच्या दोन्ही बाजूला असलेले पेविंग ब्लॉक पूर्णपणे खराब झाले आहेत. काही ठिकाणी ते खचले आहेत. ते त्वरित बंदलणे आवश्यक आहे. सध्या लॉकडाऊन असल्याने या रस्त्यावर वर्दळ कमी आहे. त्यामुळे लवकरात लवकर कामं पूर्ण होऊ शकते. त्या अनुषंगाने त्वरित काम सुरू होणे आवश्यक आहे. शिर्डी पिंपळवाडी रोड हा दोन गावांना जोडणारा प्रमुख मार्ग अधिक रुंद आणि डांबरीकरण झाल्याने या रस्त्यावर वाहने सुसाट वेगाने धावत असतात. त्यातच मध्यंतरी खा. सुजय विखे पाटील यांच्या प्रयत्नाने बंद झालेली वाळू वाहतूक पुन्हा सुरू झाली आहे. वाळू वाहतूक करणारी अवाढव्य ढंपर अतिवेगाने या रस्त्यावरुन वाहतूक करत असतात. पिंपळवाडी रोडच्या दुतर्फा बरीच लोकवस्ती आहे. जि. प. प्राथमिक शाळा, दवाखाना आहे. त्यामुळे या ठिकाणी बरीच वर्दळ असते. म्हणून अपघात होण्याची शक्यता आहे. तसेच नगरपंचायतने बनविलेला रस्ता लवकर खराब होण्याची शक्यता आहे. तरी काही ठिकाणी बोर्ड लावून गतिरोधक तयार करण्यात यावे जेणेकरून सर्वसामान्य माणसाला धोका होणार नाही. यावेळी निवेदन देतांना भाजपचे शहराध्यक्ष सचिन शिंदे, जिल्हाध्यक्ष राजेंद्र गोंदकर, नगरसेवक अशोक गायके, सरचिटणीस भाऊसाहेब भोसले, उपाध्यक्ष रवींद्र गोंदकर, भाजपा नेते विनोद गंगवाल उपस्थित होते.

No comments:

Post a Comment