आ. निलेश लंकेंच्या समाजकार्यात स्वतःला घेतले वाहून.. कोरोनाग्रस्तांसाठी ती बनली मायेचा आधार ! - Nagari Davandi : Breaking & Latest Marathi News Live, Marathi News Updates

Breaking

Post Top Ad

Thursday, May 20, 2021

आ. निलेश लंकेंच्या समाजकार्यात स्वतःला घेतले वाहून.. कोरोनाग्रस्तांसाठी ती बनली मायेचा आधार !

 आ. निलेश लंकेंच्या समाजकार्यात स्वतःला घेतले वाहून.. कोरोनाग्रस्तांसाठी ती बनली मायेचा आधार !

भाळवणी येथील कोरोना सेंटरमध्ये राजेश्वरी कोठावळे यांचा रूग्णांना मानसिक आधार !


नगरी दवंडी/प्रतिनिधी
पारनेर ः पारनेरचे आमदार निलेश लंके यांनी तालुक्यातील भाळवणी येथे राज्यातील सर्वात मोठे 1100 बेड’चे श्री शरदचंद्रजी पवार साहेब आरोग्य मंदिर ( कोरोना सेंटर) सुरू केले असून हे सेंटर आज महाराष्ट्रात कौतुकाचा विषय ठरत आहे. या कोरोना सेंटरमध्ये आज महाराष्ट्रातील विविध भागातील रुग्ण उपचार घेत असून बरे होत आहेत.  त्यामुळे या कोविड सेंटरसाठी महाराष्ट्रातून अनेक ठिकाणावरून मोठ्या प्रमाणात मदतीचा ओघही सुरू आहे. या कोरोनाग्रस्त रुग्णांनासाठी मानसिक आधार देण्याचे काम आमदार निलेश लंके यांच्या विश्वासू सहकारी अहमदनगर राष्ट्रवादी युवती काँग्रेस पार्टीच्या जिल्हाध्यक्षा राजेश्वरी कोठावळे. या करत असून कोठावळे या कोरोना सेंटर मध्ये रुग्णांची मानसिक संतुलन चांगले राहण्यासाठी विविध उपक्रम घेत आहेत.
त्या कोरोना ग्रस्तांच्या आरोग्याची काळजी घेत  लअसून आमदार निलेश लंके यांच्या या सामाजिक कामांमध्ये त्यांनीही स्वतःला वाहून घेतले आहे.
दरम्यान आमदार निलेश लंके यांनी  कोरोनाच्या पहिल्या लाटेत ही गेल्या वर्षी  तालुक्यातील कर्जुले हर्या येथे 1000 बेड’चे पवार साहेबांच्या नावाने कोविड रुग्णालय उभे केले होते.  त्या वेळीही राजेश्वरी कोठावळे यांनी रुग्णांना मानसिक आधार देण्यासाठी योग साधनेच्या माध्यमातून प्रयत्न केले व त्या आज ही सध्या भाळवणी येथे सुरू असलेल्या कोरोना सेंटर मध्ये आमदार निलेश लंके यांच्या खांद्याला खांदा लावून कोरोनाग्रस्त रुग्णांची सेवा करत आहेत. आपल्या स्वतःच्या जिवाची पर्वा न करता रुग्णांसाठी दररोज नित्यनेमाने योग साधनेद्वारे मानसिक आधार देण्याचे व कोरोनाग्रस्त रुग्णांचे मानसिक संतुलन चांगले राहण्यासाठी प्रयत्न करत आहेत.
दरम्यान कोठावळे यांनी अनेक कोरोना पॉझिटिव रुग्णांना हॉस्पिटल मध्ये बेड व  रेमडीसीवीर इंजेक्शन मिळवून देण्यासाठी प्रयत्न केले आहेत.  आमदार निलेश लंके यांच्या या समाज कार्यात त्या स्वतःला झोकून देऊन काम करत आहेत. त्यांच्या या कामाचे संसदरत्न खासदार सुप्रियाताई सुळे व राष्ट्रवादी युवती काँग्रेस पार्टीच्या महाराष्ट्र प्रदेशाध्यक्षा सक्षणा’ताई सलगर, पारनेरचे आमदार निलेश लंके राष्ट्रवादी युवती उत्तर विभाग प्रमुख महाराष्ट्र दिव्या भोसले यांनी कौतुक केले आहे.

आ. लंके आमच्यासाठी प्रेरणास्रोत : कोठावळे
आमदार निलेशदादा लंके हे  सध्या कोरोनाग्रस्तांसाठी करत असलेले काम पाहून ते आमच्या सर्व सहकार्यांसाठी  त्यांचे कार्य प्रेरणास्रोत आहे. त्यांच्या या कामाने मी प्रभावित झाले त्यामुळे भाळवणी येथील कोरोना सेंटरमध्ये कोरोनाग्रस्तांची सेवा करत असून त्यांच्यासाठी योग अभ्यास घेत आहे व त्यांचे मानसिक संतुलन चांगले राहण्यासाठी प्रयत्न करत आहे. असे राजेश्वरी कोठावळे बोलताना म्हणाल्या आहेत.

राजेश्वरी बनल्या रुग्णांसाठी मायेचा आधार..
 कोरोना सेंटरमध्ये उपचार घेत असलेल्या रुग्णांना प्रेमाचा आणि मायेचा मानसिक आधार देण्याचा प्रयत्न राजेश्वरी कोठावळे या करत असून त्या रुग्णांना प्रत्यक्ष भेटून त्यांचे मानसिक संतुलन चांगले राहण्यासाठी   त्यांच्यासोबत प्रेमाने आपुलकीने संवाद साधत आहेत. व कोरोनाग्रस्त रुग्णांना त्या धीर व  आधार देण्याचा प्रयत्न करत आहेत.  त्या साधत असलेल्या संवादामुळे अनेक कोरोनाग्रस्त रुग्णांना धीर मिळाला आहे.  राजेश्वरी कोठावळे यांच्या या कामाचे आमदार निलेश लंके यांनीही कौतुक केले आहे.

No comments:

Post a Comment