स्वामिनी महिला पतसंस्थेच्यावतीने कोविड सेंटरला रोख आर्थिक मदत - Nagari Davandi : Breaking & Latest Marathi News Live, Marathi News Updates

Breaking

Post Top Ad

Thursday, May 20, 2021

स्वामिनी महिला पतसंस्थेच्यावतीने कोविड सेंटरला रोख आर्थिक मदत

 स्वामिनी महिला पतसंस्थेच्यावतीने कोविड सेंटरला रोख आर्थिक मदत


नगरी दवंडी/प्रतिनिधी
श्रीगोंदा ः श्रीगोंदा तालुक्यातील तसेच पारनेर तालुक्यातील कोंविड सेंटरला स्वामिनी महिला पतसंस्थेच्या संस्थापक चेअरमन सौ. प्रतिभाताई विठ्ठल गांधी यांनी रोख आर्थिक मदत तसेच श्रीगोंदा परिसरातील गरीब कुटुंबांना किराणा व अन्नधान्य वाटप करण्यात आले.
स्वामिनी महिला पतसंस्थेच्या संस्थापक चेअरमन सौ. प्रतिभाताई विठ्ठल गांधी यांनी पारगाव येथील कोंविड सेंटरला 5 हजार 555 रुपये रोख सेंटरमधील रुग्णांसाठी बेडशीट , उशी, खोळं, टॉवेल, चादर 5 डस्टबिन, 5 ट्रे, 200 मास्क, हॅन्डग्लोज डेटॉल , सॅनिटायझर पाच लिटर, 30 किलो पोहे असे साहित्य दिले. आढळगाव येथील कोविड सेंटरला 2100 रु मदत व निलेशजी लंके प्रतिष्ठान भाळवणी येथील कोविड सेंटरला 2100 रु ड्रायफ्रूट दिले. त्याच बरोबर श्रीगोंदा परिसरातील वैदू समाजाच्या व नाव्ही समाजाच्या सुमारें 80 गरीब व गरजू कुटुंबांना तहसीलदार प्रदीप पवार यांच्या हस्ते किराणा व अन्नधान्य वाटप केले.

No comments:

Post a Comment