आरोग्यसंपन्न जीवन जगण्यासाठी योग प्राणायाम अतिशय महत्वाचे ः टेमकर - Nagari Davandi : Breaking & Latest Marathi News Live, Marathi News Updates

Breaking

Post Top Ad

Monday, May 24, 2021

आरोग्यसंपन्न जीवन जगण्यासाठी योग प्राणायाम अतिशय महत्वाचे ः टेमकर

 आरोग्यसंपन्न जीवन जगण्यासाठी योग प्राणायाम अतिशय महत्वाचे ः टेमकर


नगरी दवंडी/प्रतिनिधी
अहमदनगर ः आपल्याला आरोग्यसंपन्न जीवन जगण्यासाठी योग प्राणायाम करणे अतिशय महत्वाचे असल्याचे राज्याचे शिक्षण संचालक दिनकर टेमकर यांनी सांगितले आहे.   मोरोक्को देशातून  योग शिक्षिका रचनाताई फासाटे /सदाफुले यांनी भारत देशातील आपल्या मायभूमीची सेवा करण्यासाठी अहमदनगर जिल्ह्यातील शिक्षक ,शिक्षिका ,अधिकारी यांच्या आरोग्यासाठी मोफत आंतरराष्ट्रीय ऑनलाईन योग प्राणायाम शिबिर घेतले .या शिबिराचा समारोप करताना ते बोलत होते .योग प्राणायाममुळे आपली प्रतिकारशक्ती वाढते  त्यामुळे आपण योग प्राणायाममध्ये नेहमी सातत्य ठेवण्यास सांगून या उपक्रमाचे अभिनंदन केले. असे आरोग्यदायी उपक्रम राज्यपातळीवर राबविण्यासाठी प्रयत्न करणार असल्याचे त्यांनी सांगितले . पाथर्डी तालुक्यातील उपक्रमशील शिक्षक तुकाराम अडसूळ व
 यांच्या पुढाकाराने हे ऑनलाईन शिबिर दिनांक  11 मे 2021  पासून 16 मे 2021 पर्यंत आयोजीत करण्यात आले होते.या शिबिरात शिक्षक, शिक्षिका , त्यांचे कुटुंब  काही अधिकारी असे सुमारे पाचशेजण  उस्फूर्तपणे सहभागी झाले होते.सध्या संपूर्ण जगावर कोरोनाचे संकट आहे.त्यामुळे या संकटाला तोंड देण्यासाठी आपली प्रतिकारशक्ती वाढणे ,ऑक्सिजन पातळी वाढणे , आपले आरोग्य निरोगी राहणे यासाठी योग प्राणयामची अत्यंत आवश्यकता आहे .हा उद्देश  समोर ठेवून मोरोक्को देशातून योग शिक्षिका रचनाताई फासाटे /सदाफुलें यांनी झूम मिटिंगद्वारे हे योग प्राणायाम शिबिर  दररोज एक तास असे सहा दिवस घेतले.  या शिबिरात त्यांनी विविध प्रकारचे योग प्राणायाम बाबत कृतिशील व आनंददायी मार्गदर्शन करून  हे योग प्राणायाम करून घेतले.सर्वांना या शिबिराचा चांगला फायदा झाला.या शिबिरात अहमदनगर जिल्ह्याचे भूषण पद्मश्री पोपटराव पवार , महाराष्ट्र राज्याचे शिक्षण संचालक दिनकर टेमकर ,पद्मश्री राहीबाई पोपेरे ,जिल्हा शिक्षण प्रशिक्षण संस्थेचे प्राचार्य चे डी.डी.सुर्यवंशी , अहमदनगर जिल्हा परिषदेचे शिक्षणाधिकारी गुलाब सय्यद , पाथर्डीचे गटशिक्षणाधिकारी अभयकुमार वाव्हळ ,नेवासा पंचायत समितीचे शिक्षण  विस्तार अधिकारी शिवाजी कराड ,शेवगावचे गटशिक्षणाधिकारी
रामनाथ कराड ,राष्ट्रपती पुरस्कार विजेते एटीमचे राज्य संयोजक व शिक्षण मंत्रालयाच्या गुणवत्ता कमिटीचे सदस्य विक्रम अडसुळ  ,आदर्श गाव हिवरे बाजार शाळेतील आदर्श शिक्षिका शोभाताई पवार ,
पारनेरचे गटशिक्षणाधिकारी बाळासाहेब बुगे  या शिबिरात कृतिशील सहभाग घेतला. शिबिरातील समारोपात पद्मश्री राहीबाई पोपेरे यांनी या शिबिरामुळे शिक्षकांचे आरोग्य उत्कृष्ट राहील असे सांगितले. संगमनेर डाएट चे प्राचार्य डी.डी .सूर्यवंशी यांनी सध्याच्या संकटात योग प्राणायामची अतिशय गरज असल्याचे सांगून शिबिरातील उत्कृष्ट अनुभव सांगितले. अहमदनगर जिल्हा परिषदेचे शिक्षणाधिकारी गुलाब सय्यद यांनी या शिबिरामुळे सर्वांच्या आरोग्यास फायदा होणार असल्याचे सांगून शिबिरातील सर्वांचे  अभिनंदन केले. राष्ट्रपती पुरस्कार प्राप्त शिक्षक विक्रम अडसूळ यांनी हा उपक्रम संपूर्ण राज्यात घेणार असल्याचे सांगितले.हिवरे बाजार शाळेतील आदर्श शिक्षिका शोभाताई पवार यांनी योग प्राणायाममुळे प्रतिकारशक्ती वाढून  आपण निरोगी राहतो असे सांगून आम्ही सहकुटुंब या शिबिरात  आनंदाने सहभागी झाल्याचे सांगितले .या शिबिराबद्दल सर्व शिक्षकांनी उत्कृष्ट प्रतिक्रिया व्यक्त केल्या .  हे योग प्राणायाम  शिबिर आयोजित करण्यासाठी उपक्रशील शिक्षक तुकाराम अडसूळ- पाथर्डी, शुभांगी शेलार- शेवगाव ,राजू बनसोडे -राहाता यांनी  यांनी परिश्रम घेतले.  या  सामाजिक उपक्रमाबद्दल अनेकांनी विशेष अभिनंदन केले आहे.

No comments:

Post a Comment