लंघेंच्या पुढाकाराने शिरसगावात कोविड सेंटर - Nagari Davandi : Breaking & Latest Marathi News Live, Marathi News Updates

Breaking

Post Top Ad

Monday, May 24, 2021

लंघेंच्या पुढाकाराने शिरसगावात कोविड सेंटर

 लंघेंच्या पुढाकाराने शिरसगावात कोविड सेंटर


नगरी दवंडी/प्रतिनिधी
नेवासा ः अहमदनगर जिल्हा परिषदेचे माजी अध्यक्ष युवा नेते विठ्ठलराव लंघे पाटील यांच्या पुढाकाराने नेवासा तालुक्यातील शिरसगाव येथे स्वर्गीय आमदार वकिलराव लंघे पाटील फाऊंडेशनच्या वतीने पन्नास बेड क्षमतेचे कोविड सेंटर सुरू करण्यात आले.या कोविड सेंटरचे उदघाटन सोमवारी दि.24 मे रोजी नेवासा येथील संत ज्ञानेश्वर महाराज मंदिर देवस्थानचे प्रमुख हरिभक्त परायण गुरुवर्य शिवाजी महाराज देशमुख यांच्या हस्ते करण्यात आले.
शिरसगाव या आपल्या गावी युवा नेते विठ्ठलराव लंघे पाटील यांनी पंचक्रोशीतील रुग्णांच्या आरोग्याच्या दृष्टीने कोविड सेंटर उभारण्याचा निर्णय घेतला आहे. शिरसगाव येथील मातोश्री सुलोचनाबाई वकीलराव लंघे पाटील इंग्लिश मेडियम स्कूलच्या जागेत हे कोविड केयर सेंटर सुरू झाल्याने पंचक्रोशीतील नागरिकांना दिलासा मिळाला असून रुग्णसेवेच्या पुण्याच्या कार्याला सर्वांनी राष्ट्रीय कार्य समजून हातभार लावावा असे आवाहन यावेळी  हभप शिवाजी महाराज देशमुख यांनी केले.
यावेळी बोलताना विठ्ठलराव लंघे पाटील म्हणाले की राज्यात व जिल्ह्यात कोरोनाची परिस्थिती लक्षात घेता आपल्या पंचक्रोशीतील गावे सांभाळली तर कोरोनाचा प्रादुर्भाव कमी होऊ शकतो हे ध्यानात घेऊन आम्ही सर्वजण गावकरी मंडळी कार्यकर्ते यांच्या सहकार्याने हे कोविड सेंटर सुरू करत आहे.सदर कोविड सेंटर हे शंभर क्षमतेचे असून परिस्थिती पाहून बेडची संख्या वाढविली जाईल या कोविड सेंटरमध्ये रुग्णांना मोफत उपचार व सुविधा दिली जाणार असल्याचे त्यांनी यावेळी बोलताना सांगितले.
या प्रसंगी हभप नवनाथ महाराज मुंगसे,जिल्हा परिषदेच्या सदस्या डॉ.तेजश्री लंघे,सरपंच छगनराव खंडागळे,माजी सरपंच नवनाथ देशमुख, पंचायत समितीचे सदस्य संजय खरे,प्राथमिक आरोग्य केंद्राचे वैद्यकीय अधिकारी डॉ.दीपक डिंबर, डॉ.संजय तावरे,डॉ.कदम,सुनील वाघमारे,वसंत बापू देशमुख, अरुण देशमुख, संतोष काळे सर,शहाजी गडेकर,दत्तात्रय पोटे,गणेश लंघे,प्रदिप ढोकणे यांच्यासह पंचक्रोशीतील
मान्यवर उपस्थित होते.दत्तात्रय पोटे यांनी कार्यक्रमाचे सूत्रसंचालन केले तर शिक्षक विठ्ठलराव काळे यांनी उपस्थितांचे आभार मानले.

No comments:

Post a Comment