प्राथमिक शिक्षकांच्या बदली धोरणात सुधारणा करा अखिल महाराष्ट्र प्राथमिक शिक्षक संघाची मागणी - Nagari Davandi : Breaking & Latest Marathi News Live, Marathi News Updates

Breaking

Post Top Ad

Friday, May 28, 2021

प्राथमिक शिक्षकांच्या बदली धोरणात सुधारणा करा अखिल महाराष्ट्र प्राथमिक शिक्षक संघाची मागणी

 प्राथमिक शिक्षकांच्या बदली धोरणात सुधारणा करा अखिल महाराष्ट्र प्राथमिक शिक्षक संघाची मागणी


नगरी दवंडी/प्रतिनिधी
अहमदनगर ः प्राथमिक शिक्षकांच्या आंतरजिल्हा व जिल्हातंर्गत बदली धोरणात सुधारणा करण्याची मागणी अखिल महाराष्ट्र प्राथमिक शिक्षक संघाचे राज्य सरचिटणीस कल्याण लवांडे व राज्य संघटक राजेंद्र निमसे यांनी ग्रामविकास मंत्री हसन मुश्रीफ यांना निवेदनाद्वारे केली.
राज्यमंत्री प्राजक्त तनपुरे यांनी अखिल महाराष्ट्र प्राथमिक शिक्षक संघाच्या  निवेदनानुसार प्राथमिक शिक्षका़ंच्या आंतरजिल्हा व जिल्हातंर्गत बदलीविषयी ग्रामविकासमंत्री यांना दिलेले शिफारस पत्र यावेळी सादर करण्यात आले.
आंतरजिल्हा बदली टप्पा 5 तात्काळ राबवणे व 10% अट  वगळून बदल्यांची कार्यवाही करण्याची मागणी यावेळी करण्यात आली. तसेच जिल्हातंर्गत बदलीसाठी 3 वर्षाच्या सेवेनंतर विनंती बदलीचा अधिकार मिळावा, रँडम /विस्थापित शिक्षकांना 30 जून दिनांकावर बदलीची संधी देण्यात यावी.मागील शासन निर्णयानुसार अवघड क्षेत्रात काम केलेल्या शिक्षकांना संवर्ग 3चा लाभ मिळावा. प्रतिकूल क्षेत्रात काम करणार्‍या महिलां शिक्षिकांना  बदलीचा अधिकार कायम ठेवावा. सध्या 30 कि.मी च्या आत असणार्‍या पतीपत्नीला वन युनीटचा लाभ मिळावा या प्रमुख मागण्या करण्यात आल्या.
यावेळी ग्रामविकास मंत्री मुश्रीफ यांनी बदली साँफ्टवेअर विकसित झाल्यानंतर लगेचच आंतरजिल्हा बदली प्रक्रिया र राबवण्याचे तसेच जिल्हातंर्गत बदलीसंबधी शुद्धिपत्रक काढण्यासंबधी प्रशासनाशी चर्चा करुन निर्णय घेवू असे आश्वासन दिले. तसेच शिक्षकांचे वेतन हे दर महिन्याच्या एक तारखेला होण्यासाठी सीएमपी प्रणाली द्वारे वेतन
अदा करण्यासाठी मुख्य कार्यकारी अधिकारी यांना योग्य ते निर्देश देण्या संबंधी विनंती करण्यात आली. यावेळी संघाचे राज्य सरचिटणीस कल्याण लवांडे, राज्य संघटक राजेंद्र निमसे, जिल्हा सरचिटणीस सुनील शिंदे, जिल्हा उपाध्यक्ष प्रकाश पटेकर आदी उपस्थित होते.

No comments:

Post a Comment