उपजिल्हा रुग्णालयाच्या डॉ बांगर यांची खातेनिहाय चौकशी करा - Nagari Davandi : Breaking & Latest Marathi News Live, Marathi News Updates

Breaking

Post Top Ad

Friday, May 28, 2021

उपजिल्हा रुग्णालयाच्या डॉ बांगर यांची खातेनिहाय चौकशी करा

 उपजिल्हा रुग्णालयाच्या डॉ बांगर यांची खातेनिहाय चौकशी करा

काँग्रेसचे सचिन घुलेची मागणी


नगरी दवंडी/प्रतिनिधी
कर्जत ः कोरोनाच्या काळात  विविध कामात प्रशासनाला, नागरिकांना अत्यंत सहकार्य करणारे, अपडेट माहिती देणारे पत्रकार यांनाच टोकन असूनही उपजिल्हा रुग्णालयातील डॉ सोनाली बांगर या लस देत नसतील तर त्याच्या कारभाराची चौकशी करण्यात यावी अशी मागणी युवक काँग्रेसचे कर्जत जामखेड  विधानसभा अध्यक्ष सचिन घुले यांचे नेतृत्वाखाली कार्यकर्त्यांनी तहसीलदार यांना निवेदन देऊन केली.
कर्जत येथील उपजिल्हा रुग्णालयात गेली अनेक दिवसांपासून अनागोंदी कारभार सुरू आहे, त्याबाबत सर्वसामान्य नागरिकां मध्ये मोठा असंतोष पहायला मिळत आहे. लसीकरणासाठी लोकांना टोकन वाटले जात असताना ते टोकन असणार्‍या व्यक्तींनाच लस दिली जात नसल्याचा अत्यंत गंभीर प्रकार सामाजिक कार्यकर्ते व पत्रकार आशिष बोरा यांनी उघड केला असून त्यांनी अत्यंत गंभीर आरोप केले आहेत याप्रश्नी युवक काँग्रेसचे कर्जत जामखेड विधानसभा अध्यक्ष सचिन घुले यांचे नेतृत्वाखाली तहसीलदार यांची भेट घेऊन उपजिल्हा रुग्णालयातील कारभाराबाबत जाब विचारला, दोन तासात 110 लस कशा देण्यात आल्या, फ्रंटलाइन वर्कर यादी, डॉ बांगर यांच्या वागण्याची कार्यपद्धती अशा अनेक बाबीवर चर्चा केली, यावेळी तहसीलदार नानासाहेब आगळे यांनीही काल झालेला प्रकार चुकीचाच होता हे मान्य करत याबाबत आपल्या निवेदना प्रमाणे चौकशी करू असा शब्द दिला.
यावेळी युवक काँग्रेसचे जिल्हा सरचिटणीस ओंकार तोटे, भास्कर भैलूमे, मनसेचे तालुका अध्यक्ष रवींद्र सुपेकर, शहराध्यक्ष अमोल भगत, जिल्हा विदयार्थी काँग्रेसचे सरचिटणीस प्रियेश सरोदे, अल्पसंख्यांक आघाडीचे तालुकाध्यक्ष माजीद पठाण, राजू बागवान, यश पाटील, अक्षय पाटील, प्रणित पाटील, सोनू सय्यद, आदी सह अनेक कार्यकर्ते उपस्थित होते.
डॉ बांगर यांनीही एक व्हिडिओ प्रसारित केला असून यामध्ये प्रशासनाचे काम अत्यंत प्रामाणिक पणे सुरू असल्याचे म्हटले आहे, मात्र काही लोक चुकीची माहिती पसरवत आहेत, त्याच्यावर विश्वास ठेवू नये असे म्हटले आहे त्याच्या म्हणण्यानुसार पत्रकार आशिष बोरा हे जर चुकीची माहिती देत असतील तर त्याच्यावर गुन्हा दाखल करा अशीही मागणी घुले यांनी केली.

No comments:

Post a Comment