‘कोविड रुग्णांना गोपीनाथ मुंडे अपघात विमा योजनेंतर्गत लाभ मिळावा’ - Nagari Davandi : Breaking & Latest Marathi News Live, Marathi News Updates

Breaking

Post Top Ad

Friday, May 28, 2021

‘कोविड रुग्णांना गोपीनाथ मुंडे अपघात विमा योजनेंतर्गत लाभ मिळावा’

 ‘कोविड रुग्णांना गोपीनाथ मुंडे अपघात विमा योजनेंतर्गत लाभ मिळावा’

नगरी दवंडी/प्रतिनिधी
अकोले ः संपूर्ण शेतकरी कुटुंबातील कोव्हिडं रुग्णांना गोपीनाथ मुंडे अपघात विमा योजने अंतर्गत लाभ देण्यात यावा अशी मागणी अकोले तालुका भाजपा किसान मोर्चाच्या वतीने मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांच्याकडे निवेदनाद्वारे केली आहे.        
निवेदन ई मेलद्वारे देण्यात आले त्यात म्हटले आहे की, महाराष्ट्र राज्यात कोरोनाच्या दुसर्‍या लाटेत खरी झळ शेतकरी कुटूंबाना बसली आहे. गेले तीन वर्षांपासून शेतीत कुठल्याही प्रकारचे उत्पन्न नाही. आता तर संपूर्ण कुटूंब बाधित होत आहे. शेतात काम होईना, ज्या कुटुंबात कोरोना झाला तेथे खर्च झाला अन परत दोन महिन्यापासून संपूर्ण कुटुंब घरी बसून आहे
आज हॉस्पिटल ची बिले उसनवारी करून अथवा जमिनी गहाण ठेऊन, कर्ज काढून आपले कुटुंब शेतकरी वाचवत आहे. जर आज शेतकर्‍यांना वाचवलं नाही तर आत्महत्या शिवाय पर्याय राहणार नाही. मग मदत करण्यापेक्षा आता मदत करा.
अपघात विमा योजना नुसार जो शेतकरी मयत झाला असेल त्यांना  दोन लाख अन कुटुंबबाधित झालं असेल तेथे किमान 1लाख मदत मिळावी. अशी मागणी भाजपा नेते वैभवराव पिचड व जिप गटनेते जालिंदर वाकचौरे, कैलासराव वाकचौरे यांच्या नेतृत्वाखाली किसान मोर्चाच्या वतीने भाजपचे तालुकाध्यक्ष सिताराम भांगरे, भाजपचे सरचिटणीस भाऊसाहेब वाकचौरे व किसान मोर्चा चे तालुकाध्यक्ष अविनाश तळेकर सरचिटणीस यशवंतराव अभाळे, मच्छिंद्र मंडलिक, युवा मोर्चा अध्यक्ष राहुल देशमुख, किसान मोर्चाचे रमेश राक्षे, विठ्ठल कानवडे, नरेंद्र नवले, सुरेश गभाले, केशव बोडके, सुनील उगले, अशोक आवारी, मच्छिंद्र पानसरे, अमोल कोटकर, सुभाष देशमुख, नामदेव निसाळ, आदींनी मागणी केली आहे.          
निवेदनाचे मेल श्री. अजित दादा पवार, उपमुख्यमंत्री, देवेंद्र फडणवीस, विरोधी पक्षनेते, चंद्रकांत दादा पाटील, भाजपा अध्यक्ष, दादा भुसे, कृषिमंत्री, बाळासाहेब थोरात, महसूल मंत्री यांना निवेदन पाठविण्यात आले आहे.
कोरोना च्या आजाराने शेतकरी हैराण असून शेतीत उत्पन्न नाही, दुग्ध व्यवसायाचे बारा वाजले, दूध काढायला माणूस घरात नाही, त्यामुळं जनावरे आजारी होणार मग आता शेतकरी आजारातून बरा झाला तो आता आत्महत्या करण्याची वाट न पाहता मदत मिळावी
   - भाऊसाहेब वाकचौरे,
- सरचिटणीस, भाजपा

No comments:

Post a Comment