सावेडी प्रभाग 4 मध्ये लसीकर केंद्र सुरु; माजी नगरसेवक बोरकर यांच्या प्रयत्नांना यश - Nagari Davandi : Breaking & Latest Marathi News Live, Marathi News Updates

Breaking

Post Top Ad

Saturday, May 29, 2021

सावेडी प्रभाग 4 मध्ये लसीकर केंद्र सुरु; माजी नगरसेवक बोरकर यांच्या प्रयत्नांना यश

 सावेडी प्रभाग 4 मध्ये लसीकर केंद्र सुरु; माजी नगरसेवक बोरकर यांच्या प्रयत्नांना यश

आमदार जगताप यांच्याकडे केली होता पाठपुरवा


नगरी दवंडी/प्रिंतनिधी
अहमदनगर ः नगर शहरातील सावेडी उपनगर भागामध्ये टीव्ही सेंटर जवळ जिजामाता आरोग्य केंद्र हे फक्त एकच लसीकरण केंद्र असल्याने याठिकाणी सावेडी उपनगर भागातील नागरिकांची मोठी गर्दी निर्माण होती. यावर नियंत्रण ठेवून गर्दी कमी करण्यासाठी माजी नगरसेवक अजिंक्य बोरकर यांनी तारकपुर येथे लसिकरण केंद्र सुरु व्हावे यासाठी आमदार जगताप यांच्याकडे मागणी केली होती. या मागणीला यश आले असुन जगतापयांच्या प्रयत्नाने लसीकरण केंद्र सुरु करण्यात आले आहे
प्रभाग क्रमांक 4 मधील नागरिकांना या गर्दीमुळे लसीकरणापासून वंचित राहावे लागत होतं. सदर केंद्रावर गर्दी होत असल्याने कोरोनाविषाणूचा प्रादुर्भाव पसरण्याची दाट शक्यता निर्माण झाली होती. त्यामुळे प्रभाग क्रमांक 4 मध्ये तारकपूर येथे व  गुलमोहर रोड याठिकाणी लसीकरण केंद्र सुरू करण्याची मागणी माजी नगरसेवक अजिंक्य बोरकर यांनी केली होती. आज त्यांच्या पाठपुराव्याला अखेर यश आले आहे. आज तारकपूर येथील सिंधी हॉल येथे असलेले लसीकरण केंद्र सुरू करण्यात आले असल्याची माहिती नगरसेविका शोभाताई बोरकर यांनी दिली आहे. शहराचे आमदार संग्राम जगताप यांच्याकडे या लसीकरण केंद्र सुरू करण्यासाठी पाठपुरवठा केला होता. अखेर प्रयत्नाला यश आले असे ते म्हणाल्या. माजी नगरसेवक अजिंक्य बोरकर यांच्या प्रयत्नातून तारकपूर येथील सिद्धी हॉल येथे लसीकरण केंद्र सुरू करण्यात आले त्याचा शुभारंभ आज संपन्न झाला यावेळी. यावेळी माजी नगरसेवक अजिंक्य बोरकर, चिंटू गंभीर, सुनील सहानी, लाडा शेठ भाटिया, रवींद्र नारंग, जयकुमार रंगलानी,सनी आहूजा, सावन छाबरा,शेरी ओबेरॉय,राकेश नवलानी,पूनित दुग्गल, बळू नवलानि, जस्विन अहुजा, कैलास नवलानि, हर्षल बांगर, गिरीश नवलानी तसेच आदी मान्यवर यावेळी उपस्थित होते

No comments:

Post a Comment