सामाजिक कार्यकर्ते दत्तात्रेय वामन यांना राज्यस्तरीय कोरोणा योद्धा पुरस्काराने सन्मानित. - Nagari Davandi : Breaking & Latest Marathi News Live, Marathi News Updates

Breaking

Post Top Ad

Saturday, May 29, 2021

सामाजिक कार्यकर्ते दत्तात्रेय वामन यांना राज्यस्तरीय कोरोणा योद्धा पुरस्काराने सन्मानित.

 सामाजिक कार्यकर्ते दत्तात्रेय वामन यांना राज्यस्तरीय कोरोणा योद्धा पुरस्काराने सन्मानित.

 आमदार संग्राम जगताप यांच्या हस्ते वामन यांच्या सामाजिक कार्याचे कौतुक. 



नगरी दवंडी

अहमदनगर (प्रतिनिधी)-  कोरोना महामारी च्या संकट काळात सामाजिक भावनेने घेतलेल्या विविध सामाजिक उपक्रमाची दखल घेत सामाजिक कार्यकर्ते तथा अहमदनगर ऑटो रिक्षा व टॅक्सी चालक-मालक संघटनेचे उपाध्यक्ष दत्तात्रेय वामन यांना अखिल महाराष्ट्र पत्रकार आणि पत्र लेखक संघ व स्वराज्य पोलीस मित्र पत्रकार संरक्षण आणि माहिती अधिकार संघटनेच्या वतीने कोरोना योद्धा पुरस्कार मिळाल्याबद्दल आमदार संग्राम जगताप यांच्या हस्ते सत्कार करण्यात आला यावेळी मनपा स्थायी समितीचे सभापती अविनाश तात्या घुले, नगरसेवक प्रकाश भागानगरे, सचिन जाधव, डॉ.सागर बोरुडे, विलास कराळे, लतीफ शेख, गणेश आटोळे आदी.                                                          दत्तात्रेय वामन यांनी कोरोना चे संकट काळात गोर गरीब गरजूंना अन्नधान्य मास व सैनी टायजर चे वाटप केले कोरोनचे संक्रमण रोखण्यासाठी जनजागृती करून आरसैनिक गोळ्यांचे वाटप केले व शहरात रखरखत्या उन्हात त्यांनी नागरिकांसाठी सार्वजनिक पाणपोई चालू केली व शहरातील अनाम प्रेम संस्थेच्या अंध विद्यार्थ्यांना फळाचे वाटप करून शिवजयंती साजरी केली तर कोरोना काळात रिक्षा व्यवसाय ठप्प असल्याने त्यांनी शहरातील अनेक बेरोजगार रिक्षाचालकांना किराणा किट मोफत वाटप केले तसेच गोरगरीब गरजू नागरिकांसाठी व रिक्षा चालक मालक त्यांच्या अडीअडचणी जाणून घेउन सोडविण्याचा प्रयत्न केला  कुणी उपाशी राहू नये हीच त्यांची धडपड असते कुणाला वैद्यकीय मदत लागल्यास ते तत्काळ दवाखान्यात पोचवण्यासाठी मदत करतात संघटनेच्या माध्यमातून ते रिक्षा चालक तथा गरजू नागरिकांचे प्रश्‍न सोडविण्याचे काम पूर्ण काळात निरंतर करत आहे तरी त्यांची समाजकार्याची दखल घेत हे कोरोना योद्धा पुरस्कार त्यांना सन्मानित करण्यात आले आहे या सन्मानाबद्दल त्यांचे सर्वत्र अभिनंदन होत आहे.

No comments:

Post a Comment