गरजूंना मदत करुन समाजाप्रती आपले कर्तव्य पार पाडले ः सुमित वर्मा - Nagari Davandi : Breaking & Latest Marathi News Live, Marathi News Updates

Breaking

Post Top Ad

Responsive Ads Here

Monday, May 24, 2021

गरजूंना मदत करुन समाजाप्रती आपले कर्तव्य पार पाडले ः सुमित वर्मा

 गरजूंना मदत करुन समाजाप्रती आपले कर्तव्य पार पाडले ः सुमित वर्मा

अमित ठाकरे यांच्या वाढदिवसानिमित्त मनसे विद्यार्थी सेनेच्यावतीने किराणा वाटप


नगरी दवंडी/प्रिंतनिधी
अहमदनगर ः कोरोना महामारी रोखण्यासाठी सरकारने लावलेल्या लॉकडाऊनमुळे काम-धंदे बंद आहेत. त्यामुळे हातावर पोट असणार्यांवर मोठे संकट ओढावले आहे. गेल्या वर्षीही अनेक दिवस बंद व आताही दोन महिन्यांपासून सर्वत्र बंद असल्याने या घटकांचे मोठे हाल होत असून, अनेक संकटांना तोंड द्यावे लागत आहेत. शासनाच्यावतीने मोजक्याच घटकांना मदत करण्यात येत आहे, ती ही तुटपुंजी. परंतु यातून अनेक घटक दुर्लक्षित राहत आहेत, अशा घटकांना मदत करण्यासाठी पुढाकार घेण्याची गरज आहे. यासाठीच मनसे विद्यार्थी सेनेच्यावतीने युवा नेते अमित ठाकरे यांच्या वाढदिवसानिमित्त रिक्षाचालक व घरकाम करणार्या महिलांना किराणा साहित्याचे वाटप करण्यात आले आहे. या संकट काळात प्रत्येकाने एकमेकांना मदतीचा हात देणे आवश्यक आहे. आपल्या छोट्याशा मदतीने गरजूंना या संकटाशी लढण्याची ताकद मिळेल. आजचे हे संकट लवकर दुर होईल, परंतु आपण केलेली मदत ही कायम स्मरणात राहील. गरजूंना मदत करुन समाजाप्रती आपले कर्तव्य पार पाडले आहे. ज्यांना शक्य असेल त्यांनी आपआपल्या परिने जवळपास असणार्या गरजूंना मदत करावी,  असे आवाहन मनसे विद्यार्थी सेनेचे जिल्हाध्यक्ष सुमित वर्मा यांनी केले.
मनसे विद्यार्थी सेना व सुमित वर्मा युवा मंचच्यावतीने मनसेचे युवा नेते अमित ठाकरे यांच्या वाढदिवसानिमित्त रिक्षाचालक, घरकाम करणार्‍या महिलांना किराणा साहित्याचे वाटप करण्यात आले. याप्रसंगी जिल्हाध्यक्ष सुमित वर्मा, तालुकाध्यक्ष प्रकाश गायकवाड, शहर उपाध्यक्ष स्वप्नील वाघ आदिंसह मंचचे सदस्य उपस्थित होते. सुमारे 225 परिवारास हे साहित्य देण्यात आले. याप्रसंगी स्वप्नील वाघ म्हणाले, मनसे विद्यार्थी सेनेचे पदाधिकारी व सदस्य लॉकडाऊनच्या काळात विविध प्रकारची मदत देत आहेत. कोरोना रुग्णांसाठी कोविड सेंटर, हॉस्पिटल,  औषधे, अन्नदान, रक्तदान अशाप्रकारे आवश्यक त्या गरजा पूर्ण करण्यासाठी काम करत आहेत. युवा नेते अमित ठाकरे यांच्या वाढदिवसाचे औचित्य साधून गरजूंना केलेल्या मदतीमुळे कार्यकर्त्यांनाही प्रोत्साहन मिळणार आहे. यावेळी ओंकार काळे, प्रमोद ठाकूर, गौरव जगदाळे, अनिकेत जाधव, सनी वैराळ, महादेव  दहिफळे, सागर महेसुनी, प्रमोद जाधव, विजय गाढवे, कार्तिक थोरात, शुभम जाधव आदि उपस्थित होते. या उपक्रमांचे अनेकांनी कौतुक करुन सुमित वर्मा यांचे आभार मानले.

No comments:

Post a Comment

Post Bottom Ad

Responsive Ads Here